मेळघाट मध्ये परतीच्या पावसाने शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान...


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 


मेंळघाट मध्ये परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सर्व जनजीवन विस्कळीत झाले आहे.ऐन पीक काढणीच्या वेळी अश्या प्रकारे पावसाचं आगमन म्हणजे संपूर्ण पिकाची नासाडी झाली आहे.निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.सोयाबीन व ज्वारी पिकाची काढणी सुरु असताना त्यावर धो धो पाऊस आल्याने संपूर्ण पिके उध्वस्त होत आहेत.तोंडाशी आलेला घास हिरावल्या जात आहे.मेळघाट मधील धारणी व चिखलदरा दोन्ही तालुक्यात मागील काही दिवसापासून पाऊस सतत सुरु होता. मध्यन्तरी काही दिवस पावसाने सवड दिल्याने परिस्थिती पूर्वपदावर येताना दिसत होती. परंतु पुन्हा परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने  खरीप हंगामातील बहुसंख्य शेतकऱ्यांचे सोयाबीन,  ज्वारी, मका,कापूस,भुईमूग, यांसारखी पिके काढणे सुरु असताना पाण्याखाली गेली. मेळघाट मधील बहुतांश नागरीकांचा मुख्य व्यवसाय हा शेती असून ती शेती पूर्णपणे निसर्गावर अवलंबुन आहे.त्यावरच त्यांची उपजीविका अवलंबून आहे.  मेळघाट मधील शेकडो हेक्टर जमिनीवरील पिके आधीच पाण्याखाली गेली. अंन आता परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडापाशी आलेला घास हा अतिवृष्टीमुळे हिरावल्याचे दिसून येते.सोयाबीन सडत आहे, कापूस व बोण्डया सडत आहे आहेत. महसूल व कृषी विभागाने पंचनामे करून झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावि. व शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी.अशी मागणी सर्वत्र होत आहे.


Previous Post Next Post