मौलाना कलीम सिद्दीकी व त्यांच्या साथीदारानवर लावलेले खोटे गुन्हे रद्द करा. मुस्लिम बांधवांचे उपविभागिय अधिकाऱ्या मार्फत राष्ट्रपतीना निवेदन...


 जळगाव जामोद प्रतिनिधी:-

जळगाव शहरातील मुस्लिम समाज बांधवांनी उपविभागीय कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत भारताचे राष्ट्रपती यांना दिनांक 1 ऑक्टोंबर रोजी दिले निवेदन.सदर निवेदनात असे नमुद आहे की उत्तर प्रदेश च्या योगी सरकार मुस्लिमांन सोबत द्वेष भावनेची ची राजनीति करत आहे. त्यांनी अँन्टि कन्वर्सेशन बिल आणले आणि त्याच्या अंतर्गत उमर गौतम आणि अन्य मुस्लिमांना अटक करण्यात आले. याचे उदाहरण म्हणजे मौलाना सज्जाद नोमानी वर खोटे गुन्हे दुसरे उदाहरण डॉक्टर जफरूल इस्लाम यांच्या घरी दिल्ली पोलीस ईडीने त्यांना कुख्यात अपराध्या सारखे अटक करून घेऊन गले. यामुळे जळगाव जामोद येथील मुस्लिम बांधवांनी युपी सरकार व दिल्ली केंद्र सरकारचा निषेध केला.सदर निवेदनात पुढे म्हटले आहे की मौलाना कलीम सिद्दिकी आणि त्याचे साथीदारानवर लावलेले खोटे गुन्हे रद्द करून पण त्यांची सुटका करा अशा आशयाचे निवेदन मुस्लिम बांधवांनी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतीना दिले.निवेदन देतेवेळी कारी मोहम्मद फारुक, मुफ्ती शोएब, जि़या उल्लाह खान अध्यक्ष जामा मस्जिद, अब्दुल गफ्फार मुल्लाजी सामाजिक कार्यकर्ता,शौकत शेख,एडवोकेट करीम खान, डॉक्टर शाकिर खान, सैय्यद बहोद्दिन,अज़हर खान,सैय्यद नफिस, जिकरुल्लाह खान, लियाकत खान तसेच मोठ्या संख्याने मुस्लिम बांधव उपस्थित होते.

Previous Post Next Post