वन्यजीव सप्ताह निमित्त जळगाव जामोद वनपरिक्षेत्र मध्ये करण्यात आले वृक्षारोपण भारतामध्ये दरवर्षी प्रमाणे 2 ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा केला जात असतो वन्यजीवांच्या संवर्धनाबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार पर्यावरणवादी ही इत्यादी विविध उपक्रम आयोजित करण्यात येत असतात. या निमित्ताने दिनांक 5 ऑक्टोबर रोजी जळगाव जामोद वनपरिक्षेत्र मध्ये वन्यजीव सप्ताहानिमित्त निमखेडी नाका येथे दुतर्फा 51 बांबूची रोपे लावण्यात आली. जळगाव जामोद वनपरिक्षेत्राधिकारी बी,जी कटारिया, यांच्या सौजन्याने सदर कार्यक्रमांमध्ये पर्यावरण मित्र प्रसेंजित मिश्रा व जळगाव जामोद वनपरिक्षेत्रातील सर्व वनकर्मचारी वनमजूर यांनी या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. तसेच या वेळी प्रसेंजित मिश्रा यांनी वन्यजीव सप्ताहानिमित्त वनपरिक्षेत्र कर्मचारी व मजूर यांना सविस्तर असे मार्गदर्शन केले. तसेच जळगाव जामोद वनपरिक्षेत्रातील वनांचे संवर्धन करून पर्यावरण वाचवा असा संदेश देत वन कर्मचारी यांचे आभार प्रसेंजित मिश्रा यांनी मानले.
वन्यजीव सप्ताह निमित्त वनपरिक्षेत्र जळगाव येथे करण्यात आले वृक्षारोपण...
जळगांव जा.तालुका प्रतिनिधी:-