स्थानिक जळगाव जामोद शहरातील सांस्कृतिक भवन येथे दिनांक 6 ऑक्टोंबर रोजी जळगाव ,तामगाव, सोनाळा पोलीस स्टेशनची संयुक्तरित्या शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली ,येणाऱ्या दुर्गा उत्सव, दसरा, ईद व इतर सणासुदीला कोणताही अनुचित प्रकार घडू नये, नागरिकांनी शांतता बाळगावी नियमाचे पालन व्हावे, यासाठी शांतता कमिटीचे पोलीस प्रशासनातर्फे आयोजन करण्यात आले होते, या शांतता कमिटीचे अध्यक्ष स्थानी जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील आंबुलकर हे होते तर व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती तामगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार श्री उलेमाले ,सोनाळा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री बुट्टे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर भास्कर, पोलीस उपनिरीक्षक सचिन वाकडे हे होते, कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोनाळा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बुट्टे यांनी केले. तर जेष्ट पत्रकार नानासाहेब कांडेलकर , सामाजिक कार्यकर्ते शेख गफार ,व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजय वानखडे ,दुर्गा उत्सव मंडळाचे वरवटचे प्रतिनिधी यांनी आपले मत व्यासपीठावर व्यक्त केले, सामाजिक सलोखा बरोबरच शासकीय नियमाचे पालन करून दुर्गा उत्सव साजरा करण्याचे आवाहन अध्यक्षीय भाषनात ठाणेदार अंबुलकर यांनी केले, तसेच दुर्गा देवीची मूर्ती चार फुटांपेक्षा उंच असू नये, दुर्गादेवी विसर्जनाची मिरवणूक काढू नये कोणालाही अडचण येईल किंवा वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही अशा ठिकाणी घटस्थापना करावी. दुर्गाउत्सवापुढे सजावट करू नये, दुर्गा उत्सव मंडळांनी रक्तदान शिबिरे,वृक्षलागवड असे समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करावे अशा सूचनाही ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी केल्या.शांतता कमिटीच्या बैठकीला जळगांव नगरीच्या नगराध्यक्षा सिमा डोबे, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील, शिवसेना जिल्हा उपप्रमुख तुकाराम काळपांडे यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी तसेच पत्रकार अभिमन्यू भगत,राजेश बाठे, जयदेव वानखडे,गुलाबराव इंगळे,अनिल भगत,गणेश भड,अश्विन राजपूत,मनीष ताडे,अमोल भगत,यांच्यासह सर्व दुर्गा उत्सव मंडळ प्रतिनिधी, पोलीस पाटील , शांतता कमिटीच्या कार्यक्रमाला उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक सचिन वाकडे यांनी केले तर आभार प्रदर्शन तामगांव पोलीस स्टेशनचे ठाणेदार उलेमाले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करिता पोलीस शिपाई सुनील वावगे यांच्यासह पोलीस कर्मचारी होमगार्ड यांनी प्रयत्न केले..
आगामी सण व उत्सव शांततेत पार पाडा- ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी केले आवाहन...
जळगांव जामोद प्रतिनिधी:-