चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या शेतीची तालुका भाजपाच्या वतीने पाहणी...


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

पीक विमा प्रश्न मार्गी लागावा म्हणून मुंबई येथे ठाणमांडून असलेले मा.आमदार डॉ संजयजी कुटे ह्याच्या सुचने वरून आज महसूल व ग्रामविकास विभागा ला सोबत घेऊन दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष व  जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेते बंडू पाटिल,तसेच पंचायत समिती सभापती रामाभाउ राऊत, भाजपा जिल्हा परिषद सदस्य पती अशोक काळपांडे, जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती राजू उमाळे, गजानन सरोदे, भाजप ता.अध्यक्ष प्रकाश वाघ, युवा मोर्चा ता.अध्यक्ष परीक्षित ठाकरे, सरचिटणीस रवि पाचपोर  ह्यांनी नैसर्गिक आपत्ती मूळ नुसकान झालेल्या कुरणगाड बु, भेंडवड शिवार,टाकळी पारस्कार,माऊली ,गाडेगाव बु  ह्या परिसरात महसूल विभाग तसेच ग्रामविकास विभागाचे माध्यमातून  आपत्तीची  संयुक्त पाहणी केली. ह्या गावांच्या चार ही दिशेच्या शेतात तहसीलदार सौ. शीतल सोलाट सह महसूल विभागाच्या स्थानिक मंडळ अधिकारी, तलाठी ह्यांचे सह ग्रामविकास विभागाचे अधिकारी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकडे, विस्तार अधिकारी राजपुत, ग्रामविकास अधिकारी जाणे, कुमरे ह्यांना नेऊन बंडू पाटील व पंचायत समिती सभापती रामा राउत ह्यांनी सार्वत्रिक नुकसान असल्याचे सबंधित अधिकारी ह्याच्या निदर्शनात आणून दिले , तसेच पंचनामे जलद गती ने करण्या साठी पंचायत समिती स्थरावरील अधिकारी  ह्याना  महसूल अधिकारी ह्याचा कार्यात सामाहून घेऊन   तात्काळ पंचनामे पूर्ण करावे अशा सूचना दिल्या.ह्या वेळी परिसरातील  प्रगतशील शेतकरी अजय पाटील, संजय पाटील,पवन जाणे, भानुदास इतखेडे , शिरूभाऊ उमाळे, रविभाऊ आटोळे , शहा, शिवहरी वाघ सह अनेक शेतकरी यावेळी उपस्थित होते.

Previous Post Next Post