हिवरखेड येथेच नव्हे तर शहरिभागात सुद्धा प्रत्येक तरुण पिढीजवळ महागडे मोबाईल आढळून येतात, बरेच युवक युवती मोबाईल हाताळताना दिसून येतात मोबाईलच्या आधी बाहेरगावाला असणाऱ्या आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा एकमेव पर्याय पत्र पाठवणे होता, पत्रातुनच बहीण भावाला राख्या सुद्धा पाठवत होत्या, परंतु जस जसे युग बदलत गेले आणि महागडे मोबाईल येत गेले तसं तसा पत्राचा प्रत्येक व्यक्तीला विसर होत गेला, आजच्या तरुण पिढीला तर पत्रव्यवहार काय आहे आणि कसा होता हे सुद्धा माहीत नाही, मोबाईल वरून संपर्क साधला जातो, कामे सोपी होतात ,परंतु जे मनाशी मन मिळवायचे काम ते पत्रव्यवहारातूनच होते, बोटावर मोजण्यासारखेच लोक हिवरखेड पोस्ट ऑफिस मधून पत्रव्यवहार करतात , काही आकोला आकाशवाणी यांना पत्रकार व्यवहार करतात,तर काही गावाच्या विकासा बाबत थेट मंत्रालयात पत्रव्यवहार करतात, पत्रातूनच आपुलकी वाढते मोबाईल पेक्षा पत्रव्यवहार निशुल्क दरात कधीही बरा, हे आजच्या तरुण पिढीने शिकायला पाहिजे,
जागतिक टपाल दिन,विशेष,बऱ्याच तरुण पिढीला पत्रव्यवहाराची नाही माहिती,मोबाईल मुळे पत्रव्यवहाराला विसर,
हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.