भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडीच्या वतीने दिनांक 12 ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी तसेच पोलीस स्टेशन जळगाव जामोद यांना बस स्थानकामध्ये पोलीस चौकी चालू करण्यात यावी करिता देण्यात आले निवेदन सदर निवेदनामध्ये असे नमूद आहे की जळगाव जामोद बस स्थानक राज्य परिवहन महामंडळ रामभरोसे कारभारामुळे बस स्थानकात बस वेळेवर रद्द होत असल्याने रेंगाळत असलेली बस स्थानकातील गर्दी यामुळे एखादी बस स्थानकात लागण्यापूर्वीच बस कडे धावणारी गर्दी यामुळे विपरीत घटना घडू शकते तसेच बस स्थानक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेली चिडीमारीचे प्रकार तसेच रोड मजनु यामुळे होत असलेली शालेय विद्यार्थिनींची अडवणूक यामुळे बस स्थानक परिसरामध्ये पोलीस चौकी लावण्या द्यावी तसेच बरामपुर रोडवर विनाकारण फिरणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्यावर आळा घालण्याकरीता उपाययोजना करावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले सदर निवेदन देतेवेळी जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते नेते बंडू पाटील,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन बापू देशमुख,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष परिक्षीत ठाकरे,युवा मोर्चा शहराध्यक्ष उमेश येऊल,भाजपा तालुकाध्यक्ष प्रकाश वाघ,भाजपा विद्यार्थी आघाडी जिल्हा सरचिटणीस वैभव अढाव ,भाजपा विद्यार्थी आघाडी जिल्हाउपाध्यक्ष कीर्तेश अग्रवाल,अजित पाटील ,ऋषिकेश गोंड, ऋत्विक जाधव ,अतुल लोनाग्रे, ओम कपले ,प्रयाग फुसे, प्रणव ठाकरे अभिषेक म्हसाळ ,अदनान खान, गोपाल धामदर, विनायक हिसल, योगेश केदार, मयूर मुलतकर, प्रथमेश फंदाळे तसेच भाजपा युवा मोर्चा व भाजपा विद्यार्थी आघाडी चे कार्यकर्ते उपस्थित होते.
बस स्थानक परिसरात पोलीस चौकी उघडण्यात यावी करिता भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडीच्या वतीने देण्यात आले निवेदन...
जळगांव जा.प्रतिनिधी:-