शहीद निलेश धांडे यांच्या स्मरणार्थ व्यायाम शाळा व वाचनालय देवू - मंत्री बच्चुभाऊ कडू.


अकोट ता.प्रतिनिधी:-सय्यद शकिल.

अकोट तालुक्यामधील वरूर जउळका गावामधील निलेश प्रमोद धांडे हा देशाची सेवा करण्याकरिता B R O या विभागामध्ये ड्युटीवर कार्यरत असताना याला वीर मरण आले व त्यामुळे पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांवर शोककाळा पसरली त्या कुटुंबाचे सांत्वन करण्याकरिता शहीद निलेश धांडे मित्र परिवाराच्या वतीने वरुर जउळका येथील योग योगेश्वर संस्थान मध्ये श्रद्धांजली चा कार्यक्रम आयोजित करण्यत आला होता. या प्रसंगी प्रमुख उपस्थिती पालकमंत्री बच्चुभाऊ कडू यांनी श्रद्धांजलीपर भाषणामध्ये बोलताना सांगितले निलेश धांडे आपल्यातून निघून जाने म्हणजे कधीही न भरून निघनारी हानी झालेली आहे भविष्यात या गावामधून देशाची सेवा करण्याकरिता मुले निर्माण व्हावी याकरिता आम्ही निलेश धांडे यांच्या स्मरणनार्थ गावाला एक व्यायाम शाळा व वाचनालय देवू आणि निलेश धांडेच्या परिवाराला शाषणाच्या कडून मदत मिळण्याकरिता सर्वतोपरीने प्रयत्न करू आणि  निलेश धांडेच्या कुटुंबाच्या सुखदुखात आम्ही सदैव सहभागी राहू असे अभीवचन दिले याप्रसंगी निलेश धांडे यांचे आई वडील, पत्नी व भाऊ हे आवर्जून उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन योग योगेश्गवर संस्थान चे अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी केले व उपस्थित मान्यवरांमध्ये  , HDO श्रीकांत देशपांडे साहेब अकोट, दहीहांडा ठाणेदार श्री राउत साहेब, श्री वाघ साहेबसहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अकोला. श्री महाजन साहेब लिपिक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अकोला, मुंडे साहेब PSI दहीहांडा, कपिलदादा ढोके, सुशीलदादा पुंडकर, कुलदीप पाटील वसू, निखील भाऊ गावंडे, गुड्डू भाऊ घनबहादूर, पिंटूभाऊ काठोळे, बाळूभाऊ सोनटक्के, राजकुमार धारपवार, प्रवीण अंभोरे, वैभव तायडे, सुमेध घनबहादूर यांचे श्रद्धांजलीपर भाषण झाले. व सामुहिक श्रद्धांजलीचा कार्यक्रम पार पडला. व मंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या समवेत व्यासपीठावर सर्व मान्यवर मंडळी शहीद निलेश धांडे घरी जावून सांत्वनपर भेट दिली.अशी माहिती गणेश महाराज शेटे यांच्या वतीने देण्यात आली.

Previous Post Next Post