पिकांची पेरणी करताना पेरणी झाल्यानंतर शेतकरी वर्गाची ओढही पिकासाठी लागणाऱ्या हातांकडे आणि अन्नद्रव्य कडे दिसून येते पिकास आवश्यक असणारी अन्नद्रव्ये कमी जास्त प्रमाणात पहिलेच उपलब्ध असतात त्यामुळे पिकास लागणाऱ्या अन्नद्रव्यांच्या शिडकावा चे नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच जमिनीचा समतोल राखण्याकरिता तसेच जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्याकरिता माती परिक्षणाची गरज असते त्याच अनुषंगाने दिनांक १९ ऑक्टोबर रोजी पिंपळगाव काळे येथे स्वर्गवासी वीर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालय जळगाव जामोद येथील विद्यार्थिनी कृषिकन्या अंजली पवार हिने बहुसंख्य शेतकऱ्यांच्या उपस्थितीत माती परीक्षण का आणि कसे करावे या विषयावर प्रात्यक्षिक करून गेली माती परीक्षणामुळे शेतकरी हा प्रगत होऊ शकतो कारण पिकांना लागणारे अन्नद्रव्याचे प्रमाण आपल्या जमिनी मध्ये अन्नद्रव्याचे प्रमाण किती आहे हे जर शेतकरी वर्गाला माहित असेल तर तो त्याप्रमाणे त्याचे योग्य ते नियोजन करू शकतो आणि पिकाच्या होणाऱ्या नुकसानीपासून वाचू शकतो. सदर विद्यार्थिनीने ग्रामीण कृषि कार्यानुभव या उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना माती परीक्षण ना विषयी अधिक माहिती दिली प्रसंगी माती परीक्षणाचे महत्व ती कशी करावी त्यानुसार खतांचे नियोजन कसे करावे याविषयी कृषी करणे सविस्तर अशी माहिती दिली सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश गवई,कार्यक्रम अधिकारी प्रा. अविनाश आटोळे, समुपदेशक प्राध्यापिका व्ही.टी कपले, विषय विशेषज्ञ डॉक्टर सदाशिव मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
पिंपळगाव काळे येथे शेतकऱ्यांना माती परीक्षणाविषयी मार्गदर्शन...
पिंपळगाव काळे प्रतिनिधी/मंगल काकडे.