सिंदखेड राजा/सचिन खंडारे.
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला कृषी महाविद्यालय रिसोड येथील विद्यार्थिनी स्नेहल इंगळेसाखरखेर्डा हिने कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत साखरखेर्डा तसेच शिंदी येथील शेतकऱ्यांना रासायनिक खत व त्याच्या वापराबद्दल व तसेच कपाशीवरील बोंड आळी बद्दल मार्गदर्शन केले .कपाशी बोंड आळी व्यवस्थापन कसेकरावे याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.फेरोमोन सापळ्याचा वापर करावा यासाठी एकरी दोन किंवा हेक्टरी पाच फेरोमोन सापळे लावावे. सतत तीन दिवस या सापळ्यामध्ये आठ ते दहा पतंग आढळल्यास गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनाचे उपाय योजावे. फुलावस्थेत दर आठवड्याने पिकामध्ये मजुरांच्या सहायाने डोमकळ्या (गुलाबी बोंडअळी ग्रस्त फुले) शोधून नष्ट कराव्या. 5 टक्के निंबोळी अर्क किंवा अॅझॉडिरेक्टीन 0.03 (300 पी.पी.एम) 50 मी.ली. किंवा 0.15 टक्के (1500 पी.पी.एम.) 25 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.प्रत्येक आठवडयाला एकरी शेतीचे प्रतिनीधीत्व करतील अशी 20 झाडे निवडून निवड केलेल्या प्रत्येक झाडावरील मध्यम पक्व झालेल्या बाहेरुन किडके नसलेले एक बोंड असे 20 बोंडे तोडून ते भुईमुगाच्या शेंगाप्रमाणे दगडाने टिचवून त्यामधील किडके बोंड व अळ्याची संख्या मोजून ती दोन किडकी बोंड किंवा दोन पांढुरक्या / गुलाबी रंग धारण करीत असलेल्या अळ्या आढळल्यास आर्थिक नुकसान पातळी (5 ते 10 टक्के) समजून खालीलप्रमाणे रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी. थायोडीकार्ब 75 टक्के, डब्ल्युपी 25 ग्रॅम किंवा क्विनॉलफॉस 25 टक्के, एएफ 25 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 25 टक्के, प्रवाही 25 मिली किंवा प्रोफेनोफॉस 50 टक्के, 30 मि.ली. किंवा इंडोक्साकार्ब 15.8 टक्के, 10 मि.ली. किंवा डेल्टामेथ्रीन 2.8 टक्के, 10 मि.ली. या पैकी कोणतेही एक किटकनाशक प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.यावेळी परिसरातील शेतकरी उपस्थित होते व प्रात्यक्षिक याकरिता कीटकशास्त्र विभाग वाशिम शास्त्रज्ञ डवरे प्राचार्य अप्तुरकर प्रा.मसुरकर प्रा. कंकाळ प्रा. शेख व प्रा.हरणे यांचे मार्गदर्शन लाभले