हिवरखेड पोस्ट ऑफिसमध्ये जागतिक टपाल दिन साजरा,विद्यार्थ्यांनि महागड्या मोबाईल ऐवजी पत्रव्यवहाराचा सल्ला,


 हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.

हिवरखेड पोस्टऑफिसमध्ये दिनांक ९ ऑक्टोबर रोजी दुपारी टपाल दिन साजरा करण्यात आला, टपाल कधी व कोणी सुरू केले, टपाल चे फायदे आणि विद्यार्थ्यांनि  महागड्या मोबाईलचा कामापुरता उपयोग घ्यावा आणि पत्रव्यवहार करत राहावा अशी माहिती देण्यात आली असून ९ ऑक्टोबररोजी प्रत्येक पोस्ट ऑफिसमध्ये जागतिक टपाल दिन साजरा केला जातो, पत्रव्यवहार केल्याने मनाशी संपर्क केला जातो, जागतिक पोस्ट दिवस १९ ६९, मध्ये सुरू झाला तर  १ जुलै १८७६ रोजी भारत पोस्ट युनियन सदस्य झाला अशी सुद्धा यावेळी माहिती पोस्ट ऑफिसकडून मिळाली  पोस्ट ऑफिस बाहेरील टपाल पेटीला रंगरंगोटी करून हार फुलांनी सजून जागतिक टपाल दिन साजरा करण्यात आला, यावेळी उपस्थित  विठ्ठल तिवाने ,(पोस्टमास्टर)पवार मैडम ,(पोस्टमन)अजय सोनकर,एस,पी ,इंगोले, मिलींद वाली, सागर महाराज उरकडे, जिया पठाण, अर्जुन खिरोडकार हे उपस्थित होते,

Previous Post Next Post