दिनांक 9 ऑक्टोबर 2021 रोजी ग्रामपंचायत वडशिंगी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन पशुधन विकास अधिकारी गट अ म्हणून नेमणुक झालेल्या डॉ कु अश्विनी गणेशराव दाभाडे हिचा आई वडिलांसह सन्मान करण्यात आला.डिसेंबर 2019 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत आश्विनी ने यश संपादन केले होते आणि सप्टेंबर 2021 मध्ये झालेल्या मुलाखती मध्ये डॉ अश्विनी ही अमरावती विभागातुन प्रथम आली आहे,ही बाब सर्व वडशिंगी वासीयांसाठी अभिमानास्पद आहे.डॉ अश्विनी दाभाडे चे प्राथमीक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडशिंगी येथे झालेले असून पुढील शिक्षण जळगांव,अकोला आणि नागपूर येथे पूर्ण केले आहे.डॉ अश्विनी ने मिळविलेल्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत असून ग्रामपंचायत सरपंच सौ शितल ताई वानखडे,उपसरपंच दिपाली ताई भगत,सदस्या सौ सुमनताई सातव,यांच्याहस्ते अश्विनी आणि तिचे आईवडील यांचा सन्मान करण्यात आला.ग्रामस्थ म्हणून अविनाशभाऊ उमरकर यांनी देखील अश्विनी आणि तिच्या पालकांचा यथोचित सन्मान केला.तद्नंतर जि प के म प्रा शाळा वडशिंगी येथे शाळेच्या वतीने मुख्याध्यापिका सौ गोमासे मॅडम आणि सर्व शिक्षक यांनी डॉ अश्विनी आणि तिच्या पालकांचा सन्मान केला.या सर्व कार्यक्रमासाठी सरपंच सौ शीतल वानखडे,उपसरपंच सौ दिपाली भगत,सदस्या सौ सुमन सातव, श्री अविनाशभाऊ उमरकर, महादेव उमाळे, सुरेश देवचे,दीपक वडनेरकर,शिवहरी ठाकरे,गणेश डामरे, भास्कर खोद्रे, शालीग्राम वेरुळकर, अनिल जाधव, कैलास भगत,समाधान शेळके, चैताली मानकर, जिल्हा परिषद हायस्कूल चे मुख्याध्यापक पवार सर,सर्व शिक्षक, प्राथमीक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ गोमासे मॅडम आणि सर्व शिक्षक शिक्षिका, ग्रामपंचायत चे कर्मचारी आणि अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम आणि अभ्यासाच्या जोरावर आपले आणि आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करावेत आणि मोठे अधिकारी बनून आपल्या आई वडिलांची आणि ग्रामस्थांची सेवा करावी.वडशिंगी मधून आणखी मोठे मोठे अधिकारी निर्माण व्हावे असे मत डॉ आश्विनी ने सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन श्री श्रीकृष्ण भटकर सर यांनी केले.
वडशिंगी येथील कु डॉ अश्विनी दाभाडेचा नवरात्रउत्सव दरम्यान नारीशक्ती म्हणुन सन्मान...
जळगांव जा.प्रतिनिधी:-