जळगांव जा.प्रतिनिधी:-
दिनांक 6 ऑक्टोबर रोजी बुलडाणा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा वडशिंगी येथे सदिच्छा भेट दिली.तसेच शाळेत चालणारे कार्य आणि राबविण्यात येणारे उपक्रम याची माहिती जाणून घेतली.संपूर्ण शालेय परिसराची पाहणी केली."माझे प्राथमिक शिक्षण याच शाळेत पूर्ण झाले असून 1972 साली मी येथे शिकत होतो असे सदिच्छा भेटीदरम्यान प्रकाश पाटील यांनी आपल्या शाळेतील आठवणींना उजाळा दिला. आज या शाळेचे पालटलेले रूप पाहून खूप आनंद झाला.तसेच येथे येऊन माझ्या आठवणींना उजाळा मिळाला हा माझ्यासाठी सोनियाचा दिवस आहे."असे भावनिक उद्गार काढले.शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,सदस्य,ग्रामपंचायत पदाधिकारी,गावकरी या सर्वांचे या यशाबद्दल अभिनंदन केले. तसेच शाळेच्या उज्वल भविष्यासाठी आणि शाळेच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी खूप शुभेच्छा दिल्या.शाळेच्या वतीने मुख्याध्यापिका सौ गोमासे मॅडम आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री वकिलखा यांनी भाऊंचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक-शिक्षिका, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,गावकरी श्री गजानन पुंडे,रमेश उमाळे,गजानन देवचे उपस्थित होते.