जळगांव जा.प्रतिनिधी: -
आसलगांव सर्कल मधिल गावांमध्ये रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत पिकविमा वाटप सुरु झालेले आहेत. या वाटपामध्ये प्रचंड तफावत असल्याचे आढळुन आलेले आहे. आसलगांव सर्कल मंडळामध्ये ८००/९०० रुपये एकरी विमा मंजुर झाल्याचे निदर्शनास येत आहे. हा विमा मंजुर नसुन शेतकऱ्याची एक प्रकारची थट्टा या विमा कंपनीने केलेली आहे, या भागात पहिले एक महिण्याच्या जवळपास पाऊस नसल्यामुळे ५०% शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली आहे. आणी नंतर सतत होणाऱ्या अतिवृष्टी पावसामुळे मुंग, उडिद, मका, सोयाबिन, कापुस, ईत्यादी पिकाचे खुप प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. याकडे महसुल विभाग, कृषी विभाग व स्थानीक सर्व अधिकारी वर्ग यांनी दुर्लक्ष केले असुन कोणत्याच प्रकारचा अहवाल हा शासनाला योग्यरित्या सादर केलेला नाही त्यामुळे शेतकरी आज रोजी खुप मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. याचा विचार शासन आणि प्रशासनाने करावा. कारण आजरोजी या प्रकारामुळे शेतकरी खुप कर्जबाजारी झाला आहे.शेतकरी विमा हा नुकसान भरपाई मिळावी यासाठी काढत असतो परंतु नुकसान झाल्यावर अडाणी शेतकरी हा आपले नुकसान झाले हे सिध्द करण्यासाठी सिस्टम मधील अडचणी मुळे तो शेतकऱ्याचे नुकसान झाले हे सिध्द करु शकत नाही, कारण शेतकऱ्याला कोणता अहवाल कोणती तक्रार कधी करावी याबद्दल माहीती ही पुर्णपणे अजुनही उपलब्ध नाही यामुळे शेतकरी अडचणीत येतो त्यामुळे यास जबाबदार शासन आणी प्रशासन हे दोन्ही जबाबदार आहेत. म्हणुन प्रशासनाने पुढील अहवाल हा शेतकऱ्याच्या बांधावर येऊनच शासन दरबारी सादर करावा. म्हणजे शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही. कारण शेतकऱ्याच्या अडचणी ह्या आंदोलणामुळेच सोडविल्या जातात असे नाही, कारण मुळात शेतकऱ्याजवळ तेवढा वेळच नसतो तो आपल्या कामातच अडकलेला असतो.म्हणुन आम्ही शासनाला विनंती करतो की आपण एक शेतकरी पुत्र आहोत या दृष्टीने शेतकऱ्यांचा विचार करुन त्याच्या भावना आणि शेतकन्यांवर कोसळलेल्या संकटाचा आदरपुर्वक विचार करुन शेतकऱ्याला पिकविमा आणि दुष्काळी मदत मिळावी. ही आम्ही आसलगांचे युवा सरपंच व उपसरपंच या नात्याने गावातील शेतकन्यांचा व्यथा आणि अडचणी स्वतः समजुन घेऊन आपल्यासमोर मांडत आहे, म्हणुन आपण शेतकऱ्यावरील झालेल्या या अन्यायाला न्याय मिळवून देण्यास शेतकऱ्याच्या बाजुने सहानुभुतीपुर्वक विचार करुन न्याय द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.निवेदन देते वेळी आसलगावचे युवा सरपंच सुनील डीवरे युवा उपसरपंच गणेश गिरे, रुपेश वानखडे, राजू भोंगाळे, राहुल बघे, राजू गावंडे, प्रशांत अवसरमोल, राजेश भेलके, श्याम राजनकर, अनिल दांडगे गोपाल टापरे, सुनील गिरी, संजय दांडगे, ज्ञानेश्वर कवरे तसेच आसलगाव सर्कल मधील युवा वर्ग व शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.