जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम सातळी येथील ग्रामस्थांनी गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्याचा प्रश्न तत्काळ मार्गी लागावा याकरता दिनांक 18 ऑक्टोबरला सातळी येथील नदीपात्रामध्ये आमरण उपोषणाला सुरुवात केली होती.या रस्त्याचा रस्ता हा १९९७ पूर्णता खडीकरण झाला होता. परंतू मधल्या काळामध्ये सुरुवातीला ज्या शेतकऱ्यांची शेतजमीन ही या रस्त्यामध्ये जाते त्या शेतकऱ्यांनी संबंधित जिल्हा परिषद बांधकाम विभागला कोणत्याच प्रकारची कागदपत्रे दिल्या नव्हती त्यामुळे या शेतकऱ्यांनी 2017 ला हा मुख्य रस्ता बंद पडला होता परंतु ग्रामस्थांनी उपोषणाला बसून हा रस्ता चालू केला होता.परंतु 2020 ला पुन्हा या शेतकऱ्यांनी रस्ता बंद केल्याने ग्रामस्थ संबंधित जिल्हा परिषद बांधकाम विभागाने त्या शेतकऱ्याला त्याचा भूसंपादन चा प्रस्ताव तयार करण्याचे आश्वासन दिले होते.परंतु संबंधित विभागाने प्रकरण अतिशय थंड अवस्थेत चालू केल्यामुळे गेली एक वर्ष झाली हा रस्ता त्या शेतकऱ्याने बंद पडलेला आहे.त्यानंतर ग्रामस्थांचे वतीने जि प बांधकाम विभाग, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार साहेब, यांना सविस्तर निवेदन देत दिनांक 18 ऑक्टोबर पासून ग्रामस्थांनी ग्राम सातळी येथील नदीपात्रामध्ये आमरण उपोषणाला सुरूवात केली होती.उपोषणाचा दुसऱ्या दिवला बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद बुरजे, यांनी उपोषणस्थळी येऊन जिल्हा परिषद बांधकाम विभाग संबंधित शेतकऱ्याची शेत जमीन चा प्रस्ताव तयार करून कलेक्टर ऑफिसला पाठवलेला आहे. सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी साहेब यांच्या सहीनिशी तयार झाल्यानंतर यावर जिल्हा परिषद बांधकाम विभाग तात्काळ निधी उपलब्ध करून देईल नंतर लगेच संबंधित शेतकऱ्यांची शेत जमीन आमचे बांधकाम विभाग खरेदी करेल.असे आश्वासित करून लेखी पत्र दिले यानंतर उपोषण करते जंगलीमन रायपुरे, महादेव भालतडक, श्री अक्षय दामोदर पाटील यांनी उपोषण मागे घेतले.यावेळी श्री प्रसेंजित दादा पाटील, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र उमाळे , पंचायत समिती सदस्यपती प्रमोद कापसे, नायब तहसीलदार साहेब, मंडळ अधिकारी मुंडे साहेब, इंजिनीयर साहेब ,तसेच बहुसंख्य ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
लेखी आश्वासनानंतर सातळी नदीपात्रातील आमरण उपोषण मागे....!
जळगांव जा.प्रतिनिधी:-