जळगाव जामोद शहरामध्ये नुकताच भव्य विकास कामांचा लोकार्पण सोहळा तसेच भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. यातच दिनांक 12 ऑक्टोंबर रोजी तबिलपुरा परिसरात राम मंदिर येथे नगरसेवक रमेश ताडे हे त्यांच्या पत्नीसह दर्शनाकरिता गेले होते. तेथे त्यांना नगरपरिषद फंडातून रस्त्याचे काम सुरू असल्याचे आढळले त्या ठिकाणी इंजिनीयर सोबत पंकज देशमुख हे त्या ठिकाणी उपस्थित होते. त्या ठिकाणी रमेश ताडे गेले असता त्यांनी हे काम माझ्या प्रभागातील असुन कामा संबंधित इंजिनियर ला विचार ना केली असता पंकज देशमुख यांनी अर्वाच्य भाषा वापरून नगरसेवक रमेश ताडे यांच्यासोबत वाद घातला वादाचे रूपांतर हाणामारीत झाले त्यातून जळगाव पोलीस स्टेशन ला परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. जळगाव जामोद नगरपरिषदेतील विरोधी नगरसेवक जळगांव शहरात होत असलेल्या विकास कामांचा भ्रष्टाचार बाहेर काढीत असून त्यातूनच हल्ले होत आहेत.तसेच सत्ताधारी पक्षाचे लोकच जर लोकप्रतिनिधीशी असे कृत्य करीत असतील ते कितपत योग्य आहे.अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.
जळगाव जामोद शहरामध्ये शिवसेना नगरसेवकाला ठेकेदाराची अरेरावी. जळगाव जामोद पोलीस स्टेशनला परस्पर विरोधी तक्रारी दाखल...
जळगांव जा.प्रतिनिधी:-