जामोद येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन संपन्न...


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

धम्मचक्र परिवर्तन दिन तथा सम्राट अशोका विजयादशमी दिनाचे औचित्य साधून जामोद येथील गौतम नगरामध्ये 65 वा धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्थानिक ग्रामपंचायत  सदस्या कल्पना गौतम गवई ह्या होत्या  कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष जगदीश हातेकर ,ज्येष्ठ बौद्ध उपासिका आयुष्यमती कलावतीबाई पारवे  युवा उद्योजक तथा सरपंच पुत्र सन्माननीय समाधानभाऊ दामधर  आणि शाहू फुले आंबेडकर साहित्याचे गाढे अभ्यासक श्यामभाऊ उमाळे हे होते मंचकावर उपस्थित सर्व मान्यवरांनी सर्वप्रथम महाकारूणी तथागत भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले राजश्री शाहू महाराज विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले आणि त्रिशरण सह पंचशील घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आयुनी कल्पनाताई गौतम गवई यांच्या हस्ते धम्म ध्वज रोहन करण्यात आले.जगदीश  हातेकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.युवा उद्योजक समाधान भाऊ दामधर यांनी मार्गदर्शना मध्ये शिक्षणाचे महत्त्व काय असते याचे उदाहरण दिले शिक्षण घेऊन उद्योगाकडे लक्षवेधी केले सोबतच धम्माचा प्रचार आणि प्रसार या करिता मोलाचे मार्गदर्शन केले. श्याम भाऊ उमाळे यांनी भगवान गौतम बुद्ध यांच्याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता समता सैनिक दलाचे सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली त्यामध्ये लक्ष्मण हातेकर, अंबादास पारवे, रवींद्र पारवे, मोहन हातेकर, जीवन हातेकर, अमित पारवे, विकास हातेकर, निलेश हातेकर, राजू हातेकर, अमर हातेकर, सुभाष गवई, प्रकाश गवई, जनार्दन पारवे, गौतम ओकार गवई, राष्ट्रपाल शेगोकार, विशाल सपकाळ, मनोज गवई, राहुल हातेकर, दादाराव गवई, धम्मपाल हातेकर, अनिकेत हातेकर, संकेत गुरुदेव, यांच्यासह इतरही धम्म बांधवांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता मेहनत घेतली आणि महिला मंडळ यांनी खीर दान केले यामध्ये सकवारबाई हातेकर, कलावतीबाई पारवे, द्वारकाबाई गवई, कमलाबाई हातेकर, नर्मदाबाई हातेकर, शिलाबाई पारवे, उषाबाई पारवे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतम गवई यांनी केले तर आभार प्रदर्शन आयुनीन किरण तायडे यांनी केले सरणत्तय घेउन कार्यक्रमाची सांगता करन्यात आली.

Previous Post Next Post