विद्यापीठ स्तरीय जलसंधारण प्रतिकृती स्पर्धेत वसंतराव नाईक महाविद्यालयास द्वितीय पुरस्कार..


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी.

श्री संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व शिवाजी महाविद्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यापीठ स्तरीय जलसंधारण स्पर्धेमध्ये स्थानिक श्री.वसंतराव नाईक महाविद्यालयाला द्वितीय पारितोषिक प्राप्त झाल्याने सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.श्री शिवाजी महावीद्यालय अकोला येथे आयोजित जलसंधारण स्पर्धेकारिता श्री वसंतराव नाईक महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना चे स्वयंसेवक कु. ललाक्षी क्रिष्णलाल मालवीय कु. शबनम परवीन शेख व कु.निशा कैलास घाडगे यांनी अमन तोमर यांच्या मार्गदर्शनात जलसंधारण वर एकका गावाचे पाण्याचे नियोजन,  इत्यादी बाबत प्रतिकृती तयार करून आपला सहभाग नोंदविला.या स्पर्धेतअमरावती विद्यापीठातून एकूण ऐंशी स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.त्यामध्ये महाविद्यालयाचे प्रतिकृती मॉडेल मध्ये एक गावाचे पावसाचे पाणी व नदीचे पाणी कसे जमिनीत त्याच ठिकाणी मुरवता येईल या संकल्पनेवर आधारित मॉडेल असल्याने महाविद्यालयाला द्वितीय पारितोषिक  रोख 3000 रुपये सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र,कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सदर कार्यक्रमाला डॉ राजेंश बुरंगे संचालक राष्ट्रीय सेवा योजना अमरावती विद्यापीठ, डॉ. मुरलीधर वाडेकर सहसंचालक उच्च व तंत्रशिक्षण अमरावती विभाग ऍड. गजानन पुंडकर उपाध्यक्ष शिवाजी शिक्षण संस्था अमरावती हे उपस्थित होते.सदर प्रतिकृती तयार करण्याकरिता महाविद्यालयाच्या प्राचार्या सौं.चित्रलेखा देशमुख, प्रा. विकास देशमुख कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहण यामुळे महाविद्यालय पुरस्कृत झाले.महाविद्यालयाला मिळालेल्या पुरस्कारमुळे दयाराम पटेल स्मारक ट्रस्ट चे मार्गदर्शक व समाजसेवक श्री नानासाहेब भिसे, दयाराम पटेल स्मारक ट्रस्ट च्या अध्यक्षा सौं विनाताई मालवीय सचिव रमेश जिराफे व सदस्य श्री रमेशजी मालवीय यांनी विधार्थिनींचे अभिनंदन व कौतुक केले. तसेच महावीद्यालयातील सर्वच प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी कौतुक व अभिनंदन केले.

Previous Post Next Post