जळगांव जा तालुक्यातीलआदिवासी,डोंगराळ भागातील जि.प.मराठी प्राथमिक शाळा चारबन च्या शिक्षकांनी तथा खेर्डा केंद्राचे केंद्रप्रमुखांनी शाळेला देणगी स्वरूपात प्रत्येकी 6 हजार असे एकूण तीस हजार रुपये देणगी स्वरूपात दिले यावेळी नवउमीद फाउंडेशन च्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थांना शालेयपयोगी वस्तूचे वाटप एका छोटेखानी कार्यक्रमात आज दि.16 ऑक्टोबर शनिवारी करण्यात आले.जळगाव जामोद तालुक्यातील विविध उपक्रम राबवून जिल्हाभर नावारूपास आलेल्या चारबन शाळेची आय.एस.ओ.कडे वाटचाल सुरू आहे त्यानिमित्ताने समाजातील विविध दातृत्ववान लोकांनी शाळेला इन्व्हर्टर, बॅटरी,पंखे,स्मार्ट एल.ई.डी .टीव्ही,कम्प्युटर,शाळा प्रवेशद्वार फलक व रोख स्वरूपात सुद्धा मदत केली.त्यानुसार खेर्डा केंद्राचे केंद्रप्रमुख केशरसिंग राऊत व चारबन शाळेचे मुख्याध्यापक गोवर्धन दांडगे,दीपक उमाळे,माधव मोसंबे,ममता गावित यांनी सुद्धा 'आधी केले मग सांगितले'या उक्तीप्रमाणे शाळेतील भौतिक सुविधेसाठी उदारता दाखवीत तीस हजार रुपयांची रक्कम शाळेला भेट दिली या वेळी छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुलाबसींग ससत्या अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती व गाठया जमरा यांची प्रमुख उपस्थिती होती तर नवउमेद सेवाभावी संस्था पुणे चे अमोघ मायी,जयंत तायडे,केशरसिंग राऊत केंद्रप्रमुख यांची मंचावर उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात दीपक उमाळे यांनी शाळेची iso कडे वाटचाल असून आर्थिक अडचणीमुळे शिक्षकांनी शाळेला देणगी दिल्याचे सांगितले व समाजातील दातृत्ववान लोकांनी पुढे येऊन आदिवासी,गरीब मुलांच्या दर्जेदार शिक्षनासाठी मदत करण्याचे आवाहन केले नंतर नवउमेद संस्थेच्या वतीने शाळेतील सर्व 125 विद्यार्थ्यांना रजिस्टर,वही,पेन,चॉकलेट इ.शाले यपयोगी वस्तूंचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.संचालन गोवर्धन दांडगे तर,आभार माधव मोसंबे यांनी मानले.कार्यक्रमाला ममता गावित शिलेश गावित,सारिका आत्राम सह शाळा व्यवस्थापण समितीच्या सदस्यांची उपस्थिती होती.
शिक्षकांसह केंद्रप्रमुखांनी दिली शाळेला तीस हजार देणगी व शालेयपयोगी वस्तूचे वाटप...
जळगांव जा.प्रतिनिधी:-