जळगांव जा.प्रतिनिधी:-
जळगाव जामोद तालुक्यातील जामोद येथे दिनांक 16 ऑक्टोंबर च्या रात्री अज्ञात हिंस्त्र जनावराने जामोद येथील च आदिवासी आश्रम शाळेच्या जवळील जगन्नाथ हिस्सल यांच्या शेतामध्ये बांधलेल्या एका गाईचा फडशा पाडला. तसेच याच ठिकाणावरून काही अंतरावरील राजीव गांधी यांच्या शेतातील म्हशीचा सुध्दा अज्ञात हिस्त्र जनावराने फडशा पाडला. या घटनेमुळे जामोद येथील नागरिकात भीतीचे वातावरण आहे. तसेच वनविभागाने या हिस्त्र पाण्याचा शोध घेऊ त्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा तसेच या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून या शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी. या घटनेमुळे नागरीक हिंस्त्र प्राणी कोणता याविषयी तर्कवितर्क लावत आहे.