जळगाव जा प्रतिनिधी :-
आर.पी.आय. युवा जिल्हा अध्यक्ष (गवई गट) प्रशांत तायडे यांनी महाराष्ट्र विधीमंडळ अनुसूचित जाती कल्याण समीतीकडे ४ सप्टेंबर रोजी बुलढाणा येथे विविध मांगण्यांचे निवेदन सादर केले.४ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्य विधानमंडळ कल्याण समीती बुलढाण्यात दाखल झाली असून, अनुसूचित जाती संदर्भात सर्वच विभागाचा आढावा घेणार आहे.समीतीच्या प्रमुख आ.प्रनीतीताई शिंदे यांच्या सह समीती सदस्य यशवंत माने,लहू कानडे,लखन मलीक,सुनील कांबळे,नामदेव ससाने,अरुण लाड,राजेश राठोड, विधानमंडळ सचीवालयातील अव्वर सचिव श्री.खोंदले,कक्ष अधिकारी बेंगलवार आदी सदस्य समीतीत आहेत.समीतीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांच्या संदर्भात ज्या ठिकाणी कमीशन येते त्याच ठिकाणी कामे मंजूर केल्या जातात..विशेष म्हणजे कृती आराखड्याला बगल देवून हायमास्ट वाटर फिल्टरलाच प्राधान्य दील्या जात आहे.खरे पाहता दलीत वस्तीमधील नाली, रस्ते,वाचनालय, समाज मंदीर दुरूस्ती, नविन समाजमंदी यासारख्या मुलभूत कामांना प्राधान्य देण्याएवजी हायमास्ट,वाटर फिल्टर यावरच भर दिल्या जात आहे,हे कुठतरी थाबलं पाहिजे.निवेदनात पुढे म्हटले आहे की,महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अंतर्गत विशेष घटक योजने देणारी रक्कम ही पाच लाख रुपरे असूध त्यामध्ये वाढ करण्यात येवून अनुदानातही वाढ करण्यात यावी.प्रधानमंत्री आवास योजनेतूध आज रोजी मोठ्या प्रमाणात अनुसूचित जातीचे लाभार्थी वंचीत राहत असून,त्यासाठी ग्रामसभेने तयार केलेल्या केलेल्या घरकुल यादीमधुनच लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा.जेनेकरून कोणताही लाभार्थी घरकुलापासून वंचीत राहणार नाही. त्याचबरोबर जिल्ह्यात दलीत वस्तीचा निधी ईतरत्र वळविण्यात आला असून दलीत वस्ती वगळता ईतर ठिकाणी खर्च करण्यात आला आहे,त्याची सुद्धा समीतीने सखोल चौकशी करावी.तसेच बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच कार्यालयातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचा अनुषेस तात्काळ भरण्यात यावा.याकडेही समीतीचे लक्ष वेधले.बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील भोन गावालगत ऐतिहासिक असे पुरातन स्तुप आणि वास्तुचे अशषेस सापडले असून, गेल्या दहा वर्षाअगोदर डेक्कन काँलेजचे देवतारे सरांच्या टीमने केलेल्या उत्खननात ते सिद्ध झाले आहे. परंतु जिल्ह्यात होत असलेल्या जिगाव सिंचन प्रकल्पामुळे हा संपूर्ण परीसतर पाण्याखाली जात असून,त्याची आहे त्याच ठीकाणी जतध व संवर्धन करावे,त्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यात यावा.इत्यादी मागण्यांचे निवेदन आर पी आय गवई गटाचे युवा जिल्हा अध्यक्ष प्रशांत तायडे महाराष्ट्र विधीमंडळ अनुसूचित जाती कल्याण समिती महाराष्ट्र राज्य यांचेकडे सादर केले.