हिवरखेडची चंडिका आई नवसाला पावणारी भक्तांच्या हाकेला धावणारी,मंदिराच्या परिसरात असायची राधानावाची गाय,


हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.

नवरात्री विशेष,

हिवरखेड चंडिका चौकात जुन्या  काळापासून चंडिका माताची स्थापना झालेली आहे ,या चंडिका माताला मरी माता सुद्धा  म्हणतात आधीच्या काळात या मंदिराच्या परिसरसर राधाई नावाची गाय होती त्या गायने एका वासराला जन्म दिला व पंचांनी ते वासरू विकून मंदिराची त्याकाळी निर्मिती केली होती, तर काही काळ राऊत परिवाराने सुद्धा मंदिरांची जबाबदारी सांभाळली होती, मंदिराचा आज रोजी  व्यवस्थित रित्या  जीर्णोद्धार झाला  असून आणखी मंदिराचा विकास करायला  मंदिराच्या कार्यकर्त्यांनी झटपट सुरू आहे ,या मंदिरात  दरवर्षी गणेश उत्सव व नवरात्री उत्सव साजरा केला जातो तर प्रत्येक एकादशी व मंगळवारी भाविक महिला भजने कीर्तने करतात तर चैत्र,आषाढीला येथे गावातील महिला धूप आरती देतात नवरात्री मध्ये या चंडिका चौकात उत्कृष्ट सजावट केली जाते , चंडिका माता अनेक भक्तांना पावली, अशी भक्तांची व्याख्याहिता आहे, अनेक भक्तांच्या मनोकामना मरी माताने पूर्ण केल्या आजही मरी माता भक्तांच्या हाकेला धावून येते  असे भक्त सांगतात,  सद्या मंदीराचे  पुजारी म्हणून मधुकर कांतोळे महाराज काम पाहतात मंदिरात रात्रदिन सेवा देतात.

Previous Post Next Post