जळगांव जामोद. तालुक्यातील खेर्डा येथील रहिवासी पिंटू सेठ सौदागर यांचे हृदय विकाराच्या तीव्र धक्याने निधन झाले होते.त्यावेळी संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होऊन समाजमन हेलावले होते.स्व. पिंटू सेठ हे दान धर्मावर विश्वास ठेवणारे व सतत अन्नदान करून गरजू लोकांना मदत करण्याचा त्यांचा स्वभाव विशेष होता.गेल्या 8 ऑक्टोबर रोजी त्यांच्या जन्मदिवस असल्याने त्यांचा अन्नदान व समाजसेवेचा वसा पुढे चालवणारे त्यांचे कनिष्ठ बंधू अमोल सेठ सौदागर यांनी दुर्गम आदिवासी भागातील जि.प.म प्रा.शाळा चारबन ला पंखे,इन्व्हर्टर,बॅटरी असे एकूण 32,000 साहित्य भेट दिले.जळगांव जा तालुक्यातील चारबन शाळा ही नेहमी विविध उपक्रम राबवून जिल्हाभर चर्चेत आली आहे. अशात शाळेतील शिक्षकांनी शाळा iso करण्याचा प्रयत्न करीत असून त्यांना अमोलसेठ सौदागर यांनी मदत करून जणू समाजसेवेचे व्रत जोपासले आहे.अशाच प्रकारे समाजातील लोकांनी पुढे येऊन गरजू शाळांना मदत केल्यास तालुक्यातील शीक्षणाचा आलेख चढत जाईल एवढे मात्र खरे.
स्व. पिंटूसेठ सौदागर यांच्या वाढदिवसानिमित्त चारबन शाळेला विविध वस्तू भेट...
जळगांव जा.प्रतिनिधी:-