सिंधीकॅप जवळील खदान मधील वृध्द महीलेचा मृतदेह संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने बाहेर काढला..

 

अकोला जिल्हा प्रतिनिधी:-

अकोला येथील सिंधी कॅप्म जवळील वाठुरकर   खदान मध्ये एका महीलेचा मृतदेह असल्याची माहीती खदान पो.स्टे.चे ठाणेदार श्रीरंग सनस साहेब यांनी मानवसेवा आपत्ती व्यवस्थापनाच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ येण्याचे सांगितले.यावेळी जिवरक्षक दीपक सदाफळे यांनी लगेच पथकाचे स्वयंसेवक अंकुश सदाफळे,मयुर सळेदार, यांना शोध व बचाव साहित्य घेऊन घटनास्थळी पाठविले असता मृतदेह हा मध्यभागी असल्याने तसेच खदान मध्ये सांडपाणी असल्याने अतिशय दुर्गंधी येत असल्याने रेस्क्युबोट टाकुन अर्ध्या तासात महीलेचा मृतदेह बाहेर काढला.यावेळी खदान पो.स्टे.चे ठाणेदार श्री.श्रीरंग सनस साहेब, पो.हे.काॅ.डी.पी. सुरडकर,पो.काॅ.अविनाश राठोड,पो.काॅ. निलेश खंडारे,म.पो.यशोधा पैठणकर,व नातेवाईक उपस्थित होते.अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दीली आहे .

Previous Post Next Post