कवचकुंडल अभियान अंतर्गत नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्या- तहसीलदार सैपन नदाफ..


 (संदीप मापारी पाटील )

लोणार कोरोना च्या तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी कवचकुंडल अभियानाअंतर्गत तालुक्यातील ज्या नागरिकांनी अद्याप पर्यंत कुरणा प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला नाही त्यांनी आपल्या जवळच्या लसीकरन केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावे असे आवाहन लोणार तहसील चे कर्तव्यदक्ष तहसीलदार सैफन नदाफ यांनी केले आहे स्थानिक तहसील कार्यालयाच्या हॉलमध्ये मिशन कवचकुंडल एसएससी करण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला प्रमुख उपस्थिती म्हणून नगराध्यक्ष पुनम पाटोळे यांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हा काँग्रेसचे नेते साहेबराव पाटोळे उपाध्यक्ष बादशहा खान पठाण राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किशोर मापारी नायब तहसीलदार हेमंत पाटील पत्रकार संघाचे अध्यक्ष शेख समद शेख अहमद पत्रकार संघाचे मार्गदर्शक तथा नगरसेवक डॉ अनिल मापारी आदी मान्यवर उपस्थित होते.कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा प्रसार रोखण्यासाठी 18 वर्षावरील पात्र सर्व नांगरिकाना कोव्हीड लसीचा पहीला डोस देण्याचे उदिष्ठ शासनाने ठरविले आहे त्या अंनुषगाने जिल्हात मिशन कवचकुंडल योजना राबविण्यात येत आहे ही योजना 8 ऑक्टोबर पासुन सुरू करण्यात आली असुन या कवचकुंडल योजनेअतर्गत तालुक्यातील सर्व नागरिकानी जास्तीत जास्त नागरिकानी लस घेउन आपला तालुका 100 टक्के लसिकरण मुक्त करावा असे आवाहन तहसिलदार सैपन नदाफ यांनी केले आहे.18 वर्षावरील सर्व नागरिकाना कोवीड चा पहीला डोस जर दिला तर तिसरी लाट येणार नाही आली तर तिव्रता खुपच कमी राहील मुत्यूचे प्रमाण नगन्य राहील असे तज्ञानी सांगीतले आहे या सदंर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जिल्हाधिकारी व आरोग्य यंत्रणेची यव्हिडीओ कॉन्फरन्स घेतली या पाठोपाठ जिल्हाधिकारी एस राममुर्ती यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्हामध्ये 8 ऑक्टेाबर ते 14 ऑक्टेाबर दरम्यान कवचकुंडल योजना राबविण्याचे ठरविले आहे यामध्ये या दरम्यान तालुकयातील ज्या नांगरिाकनी कोव्हीड लस घेतली नाही अशा नागरिकानी त्वरीत लस घेउन आपला व आपल्या परिवाराचा कोरोनापासुन बचाव करावा व तालुकयातील नांगरिकानी सहकार्य करावे असे आवाहन तहसिलदार सैफन नदाफ यांनी केले आहे असून यावेळी लोणार नगर परिषद मधील आरोग्य विभागाचे कर्मचारी नगरसेवक महसूल कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते

Previous Post Next Post