शेतकऱ्यांचा नरसंहार करणाऱ्या आशीष मिश्रा यांच्यावर खुणाचे गुन्हे दाखल करा. शिवसेनेच्या वतीने देण्यात आले निवेदन...

जळगांव जा.प्रतिनिधी:-

उत्तर प्रदेशातील लखीमपुर खेरी येथे भाजपाचे केंद्रीय गृह राज्यमंत्री.अजय मिश्र याच्या आशिष मिश्र नामक मुलाने कृषि कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गाड़ी चालवून ८/९ शेतकऱ्यांची हत्या केली. या अतिशय अमानवीय क्रूर प्रकाराचा शिवसेना जळगाव जा वतीने जाहिर निषेध..केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्र,त्याचा मुलगा व सहभागी असणाऱ्या भाजपाईवर हत्येचा गुन्हा दाखल करून लवकरात लवकर अटक करावी यासाठी शिवसेना जळगाव जामोद च्या वतीने आज दिनांक ०५/१०/२०२१ रोजी उपविभागीय अधिकारी (SDO) यांना जळगाव जा शिवसेना आणि युवासेनाच्या वतीने सुद्धा निवेदन देण्यात आले आहे.यावेळी शिवसेना सह संपर्क प्रमुख दत्ताभाऊ पाटील,उप जिल्हाप्रमुख तुकाराम काळपांडे,तालुका प्रमुख गजानन वाघ, नगरसेवक रमेश ताडे,संतोष बोरसे, बाबाजी टावरी„युवासेना उपजिल्हाप्रमुख शुभम पाटील„जिल्हा समन्वय ईश्वर वाघ„विधानसभा संघटक संकेत रहाटे„तालुका प्रमुख विशाल पाटील„शिव अल्पसंख्याक सेना शहर अध्यक्ष चांद कुरेशी,युवासेना उपतालुका प्रमुख  कार्तिक राऊत„पवन अवचार-युवराज देशमुख-मंगेश कतोरे रामकृष्ण वंडाळे-अक्षय भालतडक-अविनाश पाटील-आप्पा पाटील-सोपान भालतडक- वैभव जाने- प्रमुख वानखडे-नंदकिशोर तिजारे- श्रीकांत मोरखडे--समस्त पदाधिकारी सदस्य उपस्थित होते--

Previous Post Next Post