जळगाव तालुक्यात एक महसूल मंडळ वगळता संपूर्ण तालुक्याला नाममात्र स्वरूपाचा पीक विमा मिळाला असून सन 2019-21 च्या मदती मध्ये सुद्धा हा परिसर वगळला आहे तरी समान न्याय म्हणून सन 2020 ची पिक विम्याची रक्कम व 2021 ची 25 टक्के आर्थिक मदत त्वरित देण्यात यावी या मागणीचे निवेदन देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना जळगाव जामोद तहसीलदारांमार्फत युवा सेनेच्या वतीने युवा सेनेचे शुभम पाटील यांच्या नेतृत्वात दिनांक 17 ऑक्टोबर रोजी देण्यात आले.उपविभागीय जळगाव जा येथे मिळालेल्या पीक- विमा अमान्य असून जळगाव जा तालुक्यातील तीन सर्कल मधील जामोद- पि काळे- आसलगाव या तिन्ही सर्कल मधील एकरी ८००/९०० रुपये पिक विमा मिळालेला असून सम समान पिक विमा मिळाला पाहिजे- याकरिता युवा सेनाजळगाव जा वतीने निवेदन देण्यात आले.तसेच जळगाव जा तालुक्यातील ग्राम- मडाखेड ते ईलोरा- (सखारामपुर या करावा रस्त्यामुळे बरेच अपघात होतात त्यामुळे--नागरिकांना होणारा त्रास.बाब लक्षात घेता- युवासेना वितिने जि. प बांधकाम विभाग जळगाव जा यांना पण तशा आशयाचे निवेदन देण्यात आले.जळगाव जा व संग्रामपुर तालुक्यातील ओला दुष्काळजाहिर करुन शेतकऱ्यांना नुकसान हेक्टरी 50.000 रूपये मदत करण्या बाबत युवासेनेच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख शुभम पाटील- जिल्हा समन्वय ईश्वरवाघ ,विधानसभा संघटक संकेत रहाटे,तालुका प्रमुख विशाल पाटील, उप तालुका प्रमुख अण्णा वाघ- सुरज बगाडे-युवासेना,सक्रिय सदस्य आप्पा पाटील,युवराज देशमुख,गोलाप ढगे,अनिल खरे,शुभाष माने,कृष्णा चवरे सर्व युवासेना पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते!!
शेतकऱ्यांना पीकविमा व आर्थिक मदत मिळण्यासाठी शिवसेनेचे निवेदन--
जळगाव जामोद प्रतिनिधी :-