अकोट ता.प्रतिनिधी:-सय्यद शकिल.
गुरुमाऊली फिल्म प्रोडक्शन व शिव छत्रपती साम्राज्य सामाजिक शिक्षण संस्था अकोट द्वारा स्थानिक गजानन महाराज सजल विहीर येथे झालेल्या अकोट आयडॉल 2021 या पुरस्कार वितरण सोहळ्याला नुकतेच नवनियुक्त झालेले काँग्रेस कमिटी अकोला जिल्हा कार्याध्यक्ष महेश गणगणे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यामध्ये समाजासाठी दिवस-रात्र एक करून समाजाच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवून त्याला वाचा फोडणारे, तसेच समाजहित उपयोगी उपक्रम राबवून समाजासाठी आदर्श निर्माण करणारे अकोट येथील पत्रकार स्वप्निल सरकटे यांना आयडल-2021 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.