जलंब : आशा सेविकांना शिविगाळ करणाऱ्या जलंब प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ.नेहा अग्रवाल यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी आशा व गटप्रवत॔क संघटनेने केली आहे. यासाठी 27 डिसेंबर पासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदनातून देण्यात आला आहे. जलंब येथील वैद्यकीय अधिकारी डाॅ.नेहा अग्रवाल यांनी 22 डिसेंबर च्या बैठकीमध्ये आशा सेविकांना बैठकीला उशिरा येण्याच्या कारणामुळे शिवीगाळ केली. वास्तविक म्हणजे जिल्ह्य़ात दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासुन एसटीच्या बसेस बंद आहेत. दळनवळनाची खासगी वाहने वेळेवर उपलब्ध होत नाहीत. अशी परिस्थिती असतांना या मुद्यावर ज्या कोरोना योदयांनी जिवाची पर्वा न करता राञंदिवस कोरोनासोबत संघर्ष केला. त्यांना अशा प्रकारे अपमानास्पद वागणूक एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांने देणे योग्य नाही. त्याचा आशा व गटप्रवत॔क संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. त्यांच्यावर जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. निलंबनाची कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यात येईल अशा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहेत. निवेदनावर शीला ठाकरे, रंजना सोनोने,संगीता वानखडे, पंचफुला मोरे, सुनिता फुटवाईक,रेखा गांवडे,गोदावरी देशमुख यांच्या सह्या आहेत.
जलंब प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा सेविकांचे आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन..वैद्यकीय अधिकारी डाॅ.नेहा अग्रवाल यांना निलंबित करा... आशा सेविकांची मागणी.
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सुरज देशमुख R.C24 न्युज