ज्ञानेश्वर सावरकर केद्रप्रमुख बोराळा यांची चिखलदरा तालुका शिक्षण सल्लागार समिती मध्ये शिक्षक संघटना प्रतिनिधी म्हणून निवड...


राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

चिखलदरा तालुका समन्वय समिती ची निवड पंचायत समिती मार्फत नुकतेच जाहीर करण्यात आली असून सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून मेळघाट विधानसभा शेत्राचे आमदार श्री राजकुमार पटेल व उपाध्यक्ष म्हणून पंचायत समिती चे सभापती बंन्सी भाऊ जामकर यांची निवड झालेली आहे. सल्लागार समिती मध्ये चिखलदरा तालुक्यातुन एकुण विस जणांची निवड झालेली असुन समिती मध्ये तहसीलदार, तालुका वैध्यकीय अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, गटशिक्षणाधिकारी अधिकारी श्री. संदीप बोडखे साहेब, सदस्य सचिव म्हणून श्री. बाबरे साहेब गटविकास अधिकारी पंचायत समिती चिखलदरा हे असतिल. या समिती मध्ये शिक्षक संघटना प्रतिनिधी म्हणून बोराळा केंद्राचे केद्रप्रमुख ज्ञानेश्वर सावरकर यांची नियुक्ती अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या माध्यमातून झालेली आहे. श्री. सावरकर यांनी आपल्या निवडीचे श्रेय मा. आमदार राजकुमार पटेल तसेच गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना दिले आहे. मेळघाट मधिल शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता वाढीसाठी प्रशासनास परिपूर्ण सहकार्य करण्याची भावना RC NEWS चे जिल्हा प्रतिनिधीशी बोलताना सावरकर सर यांनी व्यक्त केली आहे.

Previous Post Next Post