जळगांव जामोद तालुक्यातील रसुलपुर येथे जाणाऱ्या रोडच्या लगत आज बुधवार दिनांक 22 डिसेंबर रोजी रसलपुर शिवारातील रमेश ताडे यांच्या शेता समोर नामे अजीम खान अताउल्लाखान वय 35 वर्ष, रा. बर्डे प्लॉट खामगाव यांनी निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे सदर त्यांचे नातेवाईक मोहीनोददीन सलीमोंददीन मुल्लाजी वय , रा. मुल्लापुरा, जुनाबाजार जळगाव जामोद यांचे घरी आले होते. ते मनोरूग्ण होते त्यांचा उपचार मानोपचार तज्ञ यांचेकडे सुरू होता . याविषयी मोही उद्दिन सलिम उद्दिन मुल्लाजी यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला आज दिनांक बावीस डिसेंबर संध्याकाळी तक्रार दाखल केलेली आहे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की मृतक घरी कोणालाही काही एक न सांगता घरातुन निघुन गेले व निंबाच्या झाडाला गळफास घेलतेल्या अवस्थेत मिळून आले अशा फिर्यादीच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी मर्ग क्र 90/2021 दाखल करून तपास मा पोलिस निरिक्षक यांचे आदेशाने नापोकाँ अतुल मोहाळे यांचेकडे देण्यात आला
रसलपुर शिवारात 35 वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या...
जळगांव जा.प्रतिनिधी:-