आदिवासी समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने कोटय़वधी रुपये खर्चून अतिदुर्गम भागात आश्रमशाळा सुरू केल्या. मात्र आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षने शासनाच्या उदात हेतुस हरताळ फासल्या जात आहे. असाच प्रकार जारीदा निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थीनीची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू असुन दुषित पाणी पिण्याची वेळ विद्यार्थीवर आली आहे. विहिरीवर पाण्यासाठी वीजपंपही आहे. परंतु 5ते6 दिवसापासून वीजपुरवठा बंद आहे. त्यामुळे पाणीपुरवठा होत नसल्याने बाहेरून पाणी आणावे लागत आहे.
________--_-______________
🔷दररोज मनस्ताप🔷
आदिवासी आश्रमशाळांतील विद्यार्थी निवासी असतात. स्वतंत्र वस्तीगृह प्रत्येक आश्रमशाळेत आहे. कोरोना महामारी काळात बंद असलेले वस्तीगृह व शाळा शासनाने चालू केल्या आहेत. परंतू ज्या प्रमाणात आदिवासी विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध आहेत. त्या सोई मिळत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यां सह पालक करीत आहेत. ही एक खुप मोठी शोकांतिका आहे. जारीदा आश्रमशाळेमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना पाणी सहज मिळावे. शासनाने लाखो रुपये खर्च करून विहिर बांधली परंतु विहिर शोभेची वस्तू बनली आहे. जारीदा आश्रमशाळांतील विशेषत : मुली दररोज पाण्यासाठी भटकत आहेत. विहिर न चालु करण्यामागे जो कोणी अधिकारी. कर्मचारी असेल त्याच्यावर योग्य कारवाई करावी. अशी मागणी पालकांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना केली.
--—-—---
लाखो रुपये खर्चून सरकारने विहिर बांधली तरी सुध्दा आमची मुले पाण्यासाठी भटकत असुन दुषित पाणी पित आहेत. काही बाधा झाल्यास जबाबदारी संबधित अधिकारी घेतील काय? ताबडतोब पिण्याच्या पाण्याची सोय करावी.
शंकर धिकार, पालक मेहरीअम
-------
वसतीगृहातील विहिरीवरून पाणी पुरवठा सुरू करुन आमच्या पाल्यांची पाण्यासाठी सूरु असलेली भटकंती थांबवावे
सखाराम धिकार पालक मेहरीआम