चिखलदरा तालुक्यात गेल्या दोन वर्षात अनेक ठिकाणी नदीच्या मधोमध, पाणी अडविण्यासाठी, पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत अनेक कोटी रुपयाचे सिमेट,बांधारे, बांधण्यात आले असून, ही कामे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने देण्यात आले होते, या कामाची सुपर्विजन, संबंधित चिखलदरा, पाटबंधारे विभागाचे इंजिनिअर यांच्या कडे होते, अशी माहिती मिळाली परंतु ही कामे, कॉन्ट्रॅक्ट यांनी निष्कृष्ट दर्जाचे व नियोजन शून्य असल्याने शासनाचे करोडो रुपये पाण्यात गेल्याचे दिसून आले, पिपाधरी, रुई फाटा, या दोन गावातील शेवटच्या टोकावर असलेल्या नदी मध्ये हे बांध निर्माण करण्यात आले होते, परंतु एका वर्षातच हे बांध वाहून गेल्याने, करोडो रुपये,खर्च करून, पाण्यात वाहून गेल्याची दिसत आहे, हे बांधलेले बंधारे निव्वळ दगड माती मिश्रित रेती मध्ये , बांधल्या मुळे, बांध पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचे दिसून आले, शेतकऱ्यांना जलसिंचनाचा, उपयोग होऊन पाणी आडवा पाणी जिरवा, असा उद्देश शासनाचा होता, परंतु हा उद्देश अपयशी झाल्याने, या मातीमिश्रित बांधकाम झालेल्या बंधारा चा, उपयोग, भ्रष्टाचारी, संबंधित खात्याच्या इंजिनियर व ठेकेदारांचा, झाला असल्याचे मत येथील नागरिकांनी व्यक्त केले.टैब्रुसोडा,सती,आकी, बादरपुर पिपाधरी, धरमडोह, या परिसरात बांधलेले, जाळी बांध,सिमेंट बंधारे संपूर्णता निष्कृष्ट दर्जाचे बांधल्याने, शासनाच्या करोडो रुपयाला, चुना लागल्याचे दिसून येत आहे, परंतु झोपेचे सोंग घेऊन कुत्र्या प्रमाणे भ्रष्टाचाराचे पीठ चाटणारे, कधी जागे होतील व सामान्य जनतेला केव्हा न्याय मिळेल, आदिवासी शेतकऱ्यांना मूर्ख बनविणाऱ्या, अधिकारी वर्गावर कोण वचक ठेवणार हा प्रश्न आता निर्माण झाला असून ह्या कामाची चौकशी करावी अशी मागणी आता नागरिकांनी केली आहे
पिपाधरी,"नदीतील, पंचवीस लाख रुपयाचा बंधारा एका, वर्षातच गेला पाण्यात...
राजु भास्करे /चिखलदरा