मेळघाटच्या राजकारणातील गेल्या चार दशकापासुन समाज कार्याकरीता सक्रीय असणारे कार्यकर्ता रमेश महादेवसा जिराफे राहणार दुनी हे मागील जवळपास 45 वर्षांपासुन मेळघाट मधिल आदिवासी आणि इतर लोकांची सामाजिक, शैक्षनिक व त्यांना कायम आर्थिक स्थैर्य मिळो याबाबत कार्य करीत आहे.मेळघाट मधील गल्ली पासुन तर दिल्ली पर्यंत विविध विकास कामाला त्यांचा विविध माध्यमातून हातभर लागला आहे.समाजाचा विकास करण्याच्या तळमळीतून आपल्या भागातील समस्याची जान असून ते दूर करण्याच्या त्यांच्या दृढ संकल्पातून ते आगामी जिल्हा परिषदेच्या रिंगणात उतरन्या करीता इच्छुक आहेत असे समजते. रमेश जिराफे यांच्याकडून जिल्हा परिषद निवडणूक लढण्याबाबत तयारी दर्शविल्यानंतर ते कोणत्या पक्षाकडून आपली उमेदवारी सादर करणार आहे हे भविष्यात पाहण्यायोग्य बाब ठरणार आहे.रमेश जिराफे सतत 40 वर्षांपासून चाकर्दा व दुनी आदिवासी सेवा सहकारी सोसायटी मध्ये निवडून येत आहेत, तसेच धारणी तालुका खरेदी विक्री संघात 5 वेळा निवडून येऊन 11 वर्ष उपाध्यक्ष होते. धारणी कृषी उत्पन बाजार समितीत सोसायटी मतदार संघात उभे असतांना त्यांना धारणी व चिखलदरा तालुका मधुन सर्वाधिक मते मिळाली होती.असा राजकीय प्रवास असून सद्य परिस्थितीत शिक्षण क्षेत्रात ते उत्कृष्ट काम करीत आहेत.विशेष म्हणजे मेळघाटचे शिक्षण महर्षी असलेले नाना साहेब भिसे यांचा त्यांना आशीर्वाद प्राप्त आहे.आता आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत रमेश जिराफे कोणती भूमिका घेऊन मैदानात उतरणार याकडे संपूर्ण मेळघाटवासींचे लक्ष वेधले आहे.
रमेश जिराफे जि प निवडणुक रिंगणात उतरणार !गेल्या चार दशकापासुन निस्वार्थ राजकारणातुन अवीरत समाज सेवा...
राजु भास्करे /चिखलदरा तालुका प्रतिनिधी