हिवरखेड परिसरात थंडीचा जोर वाढल्याने परिसरात नागरिक स्वेटर,मोपल तर बऱ्याच ठिकाणी सकाळ सध्याकाळ शेकोटी करतांना आढळून येतात, यंदा पाऊस जमतेम झाल्याने थंडी वाढाली असावी अशी चर्चा सुद्धा आयकायला मिळते, अशा थंडीच्या गारवात शेतकऱ्यांना आपल्या शेतीच्या मशागतीकरिता पहेरा सुद्धा द्यावा लागतो, पहाटेच्या थंडीत सुद्धा नागरिकांना आपल्या पोटाची खडगी भरण्यासाठी अशा थंडीत बाहेर पडावेच लागते, थंडीचा जोर वाढत चालला असल्यानें सर्वाना आपल्या आरोग्याची चिंता वाटते,परंतु कुटूंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी थंडी,ऊन,पावसाला मात दयावीच लागते ,ही थंडी हरभरा पिका करीता चागभली सुद्धा आहे,आणि नागरिकाच्या आरोग्याकरिता हानिकारक ठरू शकते, पुढे आणखी थंडीचा जोर फेब्रुवारी पर्यत वाढत राहणार नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, थंडीत लहान मुलांची जास्त काळजी घ्यावी लागते,
हिवरखेड परिसरात थंडीचा जोर वाढला,
हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.