जळगांव जा.प्रतिनिधी:-
दिनांक 19 डिसेंबर 2021ला रविवारी इतर मागासवर्ग संघटनेची महत्वपूर्ण बैठक जळगाव जामोद येथे ओ.पी. तायडे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. सभेत या विषयावर चर्चा करण्यात आली.राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना समोरे जाण्याबाबत. जास्तीत जास्त ठिकाणी ओबीसी उमेदवार उभे करून ओबीसींनी मतदानावर बहिष्कार न टाकता बहुसंख्येने मतदान करून ओबीसी उमेदवारासच निवडून द्यावे.2)राजकीय आरक्षणासाठी ओबीसी संघटनेने सतत प्रयत्नशील राहून पाठपुरावा करणे. 3) ओबीसींच्या राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय पातळीवर घेण्यात येत असलेल्या दिशानिर्देश कार्यक्रमाची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर जास्तीत जास्त प्रमाणात करणे.4) ओबीसी समाजाचे असणा-या प्रश्नांची जनजागृती गावागावांतून प्रत्येक ओबीसी जवळ करणे.5)ओबीसी समाजाच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सर्व OBC बांधवांची जास्तीत जास्त उपस्थिती असावी या करिता सर्वांनी आपल्या परीने जास्तीत जास्त प्रयत्न करणे.वरील विषयावर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. ओ पी तायडे साहेब यांनी इतर मागास वर्ग समाजाच्या ज्वलंत प्रश्नाला वाचा फोडली. सध्या राज्यभर तसेच देशभर चालू असलेल्या ओबीसी समाजाच्या विविध कार्यक्रमांविषयी तसेच राजकीय घडामोडींविषयी माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे राष्ट्रीय व राज्य पातळीवर होत असलेल्या विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर तसेच तालुका/गाव पातळीवर होताना दिसत नाही त्याकरिता प्रत्येक गावागावात ओबीसी जागृत झाला पाहिजे त्याला आपल्या प्रश्नांची जाण असली पाहिजे प्रत्येक माणूस जागृत होऊन जेव्हा आपल्या हक्कांविषयी बोलायला लागेल तेव्हा खरा ओबीसी जागृत होईल.या पातळीवर आपल्याला पोहोचण्यासाठी प्रत्येक गावागावात ओबीसी समाजाची जागृती करावी लागेल. असे मत श्री तायडे साहेब यांनी मांडले.ओबीसी समाजाच्या ज्वलंत प्रश्नाविषयी झालेल्या चर्चेत श्यामभाऊ इंगळे ,अर्जुन घोलप,शेख शकील शेख हबीब,जयदेव वानखडे,किशोर काळपांडे,पी आर हिस्सल,विजय म्हसाळ,सुनील धनभर, समाधान बगाडे,रघुनाथ कौलकार, श्रीकृष्ण केदार,जानकीराम येनकर वडशींगी,संजय भुजबळ ,अन्सार बाबु इत्यादींनी आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाला उपस्थित झाल्याबद्दल सर्वांचे आभार पी. आर. हिस्सल यांनी आभार मानले.