धानोरा जिल्हा परिषद शाळेला शिक्षकांची आवश्यकता...


 संजय कारवटकर/यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील उच्च प्राथमिक केंद्र शाळा धानोरा येथे शिक्षकांची  अत्यंत आवश्यक आहे, धानोरा शाळा येथे मुलाची पट संख्या 178 असुन पाच शिक्षक कार्यरत आहे . पहिली ते पाचवी पर्यंत 132 विद्यार्थी आहे तर साहवी ते सातवी 46 विद्यार्थी आहे असे एकूण 178 विद्यार्थ्यांची पट संख्या आहे मात्र शिक्षकांची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे,कोरोणामुळे विद्यार्थ्यांचे खुप नुकसान झाले आहे.धानोरा येथे एक ते सात वर्ग असुन शिक्षक मात्र पाच आहे, मुख्याध्यापक सुद्धा प्रभारी व त्यातल्या त्यात प्रभारी मुख्याध्यापकांना केंद्र प्रमुख यांचा अतिरिक्त प्रभार देऊन जबाबदारी दिली आहे.  त्यामुळे चार  शिक्षकांनी सात वर्ग सांभाळणार कसे हा प्रश्न पडला आहे धानोरा शाळेला  विद्यार्थी पटसंख्या पाहता आणखी तीन शिक्षक देण्यात यावे असे निवेदन शाळा व्यवस्थापन समितीने दि 13.12.2021 रोजी पंचायत समिती कार्यालयात देण्यात आले तरी धानोरा शाळेत मुलांच्या भवितव्याच्या विचार करून शिक्षक देण्यात यावे अशी विनंती पालक व शाळा व्यवस्थापन  समिती यांनी केली आहे.दिलेल्या विंनती ला पंचायत समिती प्रशासन दाद न दिल्यास विद्यार्थी यांच्या हितासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा पालक यांनी दिला आहे.

Previous Post Next Post