दिनांक.19/12/2021 रोजी आदिवासी समाज संघटना समन्वय कृती समिती मेळघाट चे आढावा सभा श्रीक्षेत्र वाघामाता परतवाडा येथे सकाळी 11=00वा.मा.भिलावेकर साहेब सेवानिवृत विभागीय समाज कल्याण अधिकारी,मा.मवासी साहेब,सेवानिवृत उपायुक्त,मा.पाटील साहेब,सेवानिवृत उपसंचालक(शिक्षण),मा.बेठे साहेब,सेवानिवृत नोंदणी अधिकारी,मा.ठाकरे साहेब.मा.तोटे साहेब,मा.डीगर साहेब,सेवानिवृत पोलीस उपनिरीक्षक,यांचे प्रमुख उपस्थितीत आढावा सभा संपन्न झाले.या सभेत उपरोक्त मान्यवरांनी संघटना आर्थिक व मनुष्य बळ बळकट करण्यावर भर दिला.तसेच मेळघाटातील शिक्षण,रोजगार,आरोग्य,कुपोषण,पुनर्वसन,अंधश्रद्धा या वर सर्वांनुमते संगोपांग चर्चा विनिमय करुन उपाय योजनेचे रुपरेषा ठरविण्यांत आले.कार्यक्रमात संघटनेचे अध्यक्ष,कार्याध्यक्ष,महासचिव.उपाध्यक्ष,मार्गदर्शक, सचिव, संघटक,प्रसिध्दीप्रमुख, उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.कासदेकर साहेब,विस्तार अधिकारी (पंचायत)प्रास्ताविक मा.झारेकर साहेब सेवानिवृत केंद्र प्रमुख,आणि उपस्थित मान्यवरांचे तसेच श्रोत्यांचेआभार मा.बेठे सर सेवानिवृत मुख्याध्यापक(उश्रे)यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मा.दहेकर सर,मा.पळसकर सर,मा.चिमोटे सर,मा.मावसकर सर,मा.डीगर सर,मा.साकोमे सर,मा.कैलास सर,मा.गौरव सर,मा.दहीकर सर,मा.बेठेकर सर,मा.धुर्वे साहेब,यांनी खूप या कार्यक्रमाला परिश्रम घेतले होते.
आदिवासीं संघटना समन्वय कृती समितीची सभा सपन्न...
राजु भास्करे /गौलखेडा बाजार