खामगांव जवळच असलेल्या पण जलंब तालुका शेगाव येथील रेल्वे उड्डाणपुलाचे बांधण्यात येत असलेल्या रेल्वे उड्डाणपूल बांधकामांमध्ये अवैध गौण खनिजचा वापर वापरले जात असल्याचे सिद्ध झाल्याने शेगावचे तहसीलदार यांनी घोडके इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला ४५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जलम तालुका शेगाव येथे रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे मंडळ अधिकारी जलम व तलाठी जलम यांनी 12 नोव्हेंबर 2021 रोजी शेगाव तहसील कार्यालयाला अहवाल सादर केला होता की जलम भाग दोन गट नंबर 1089 मधील रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाकरिता अंदाजे 175 ब्रास मुरूम पडलेला असून सदर काम हे आर बी घोडके इन्फोटेक लिमिटेड परभणी करीत आहे या कंपनीतर्फे मॅनेजर महादेव सोळंकी यांच्या जवळ गौण खनिज मुरूम बाबत चौकशी केली असता त्यांनी शेगाव तहसील कार्यालय येथून शंभर ब्रास मुरुमाची राॅयल्टी काढलेली असल्याचे सांगितले. तलाठी जलम यांनी 27 सप्टेंबर रोजी सादर केलेल्या अहवालात नमूद आहे की कंपनीच्या कामावर ठिकाणी गिट्टी रेती मुरूम इत्यादी गौण खनिज आढळून आलेले आहे असे नमूद केलेले आहे. याबाबत आर बी घोडके घोडके प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबाद यांना शेगाव तहसीलदारांनी नोटीस काढून त्यांचे म्हणणे मांडणे बाबत सांगितले असता 17 नोव्हेंबर 2019 रोजी सदर कंपनी कडून खुलासा सादर करण्यात आला की मुर्माचा साठा हा पाया खोदकाम व आरो बाॅल कामां मध्ये निघालेला असून त्याची राहील ती ही आमच्या बिला मधून सार्वजनिक बांधकाम विभाग खामगाव येथे कपात केली जाते बाकी आपल्या ऑफिस कडून रीतसर रॉयल्टी भरून साठा केलेला आहे याबाबत त्यांनी कोणत्याही प्रकारे कागदपत्र पुरावा सादर केलेला नसल्याने 12 नोव्हेंबर रोजी त्यांना पुनश्च नोटीस काढण्यात आलेली होती मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या अहवालानुसार सदर व मुरूम साठ्याचे मोजमाप करण्यासाठी पंचायत समिती शेगावचे शाखा अभियंता यांना तहसिलदाराकडून पत्र पाठविण्यात आले एक डिसेंबर रोजी सदरहू साठेचे मोक्यावर भाग 1 व भाग 2 चे तलाठी कोतवाल यांच्यासमक्ष मोजमाप केले असता मोक्यावर 626 ब्रास मुरूम उपलब्ध असल्याचा तांत्रिक मोजमाप अहवाल शेगाव तहसील कार्यालयात सादर करण्यात आला या प्रकरणात घोडके इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी ओळख इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने खुलाशात नमूद केले की मुरमाचा साठा हा पाया खोदकाम व आरो बोल खोदकाम मध्ये निघालेला असून त्याची राहटी ही आमच्या बिलातून सार्वजनिक बांधकाम विभाग खामगाव येथे कपात केली जाते व बाकी मुरूम आपल्या कार्यालयाकडून रीतसर रॉयल्टी चलान भरून साठा केलेला आहे मात्र याबाबत चौकशी केली असता शेगाव तहसील कार्यालयाकडून घोडके इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने शंभराचे दोन परवाने काढलेले आहेत याच्या व्यतिरिक्त गैरअर्जदार यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग खामगाव येथे घोडके कंपनी यांच्या बिलातून रॉयल्टीची रक्कम कपात केली जाते याबाबत कोणतीच कागदपत्रे अथवा चलान सादर केली नाही तांत्रिक मोजणी अहवालानुसार एकूण 626ब्रास मुरमाचा रॉयल्टी भरणा केले बाबत खुलाशात सुद्धा नमूद करण्यात आलेले नाही जलम येथील उड्डाणपुलाचे काम हे प्रचंड असून यामध्ये वापर केलेल्या कोणत्याच गौण खनिजाचे चलान घोडके कंपनी यांनी सादर केलेल्या नाहीत यामुळे शेगावचे तहसीलदार समाधान सोनवणे यांनी एकूण 626 ब्रास मुरमा पैकी केवळ दोनशे ब्रास चा परवाना या कार्यालयाकडून निर्गमित केल्याने उर्वरित 426 ब्रास मुरूम हा अवैध असल्याचे सिद्ध झाल्याने आर बी घोडके इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबाद या कंपनीला म .ज .म .आ. 1966 चे कलम 48 (7) अन्वय रॉयल्टी दोन लाख 55 हजार 600 रुपये, याप्रकरणी दंड म्हणून 42लाख 60000 रुपये असे एकूण 45 लाख 15 हजार सहाशे रुपयांचा भरणा सरकारी खजिन्यात करण्याचा आदेश शेगाव तहसीलदार समाधान सोनवणे यांनी दिला असल्याने व सदर दंडाच्या रकमेचा भरणा सात दिवसाच्या आत न केल्यास संबंधितांकडून जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल करण्यात येईल असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे या कारवाईमुळे कंत्राटदार व रॉयल्टी न भरता चोरून गौण खनिज चा साठा करणाऱ्या मध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.
जलंब येथील रेल्वे उड्डाण पूल बांधकाम मध्ये ४२६ ब्रास अवैध गौण खनिज वापरल्या प्रकरणी ४५ लाख रुपयांचा दंड !शेगांव तहसीलदार सोनवणे यांची धाडसी कारवाई !!
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सुरज देशमुख