मूर्तिजापूर तालुक्यातील पारद पूर्णा बॅरेज येथे विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती विदर्भ प्रदेश शाखा घुंगशी च्या वतीने सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या धोरणात्मक न्यायपूर्ण हक्कासाठी भविष्यातील निकराच्या संघर्षाचा गर्भित इशारा म्हणून आज 24 डिसेंबर रोजी पारद येथील पूर्णा बॅरेज येथे सांकेतिक सत्याग्रह कार्यक्रम संपन्न झाला.सुरुवातीला अगदी कवडीमोल भावामध्ये शासनाने ह्या जमिनी खरेदी केल्या वास्तविकता या जमिनीची आजच्या नियमाप्रमाणे जवळ जवळ पंधरा ते सतरा लाख एकरी किंमत आहे परंतु तदळाळी ह्या जमिनी अवघ्या दिड लाख रुपये एकरी किंमतीत खरेदी केल्या गेल्या आणि ज्यांनी त्यावेळी जमिनी खरेदी केल्या नाहीत त्यांना त्याच जमीनी आज रोजी पंधरा ते सतरा लाख रुपये किंमतीत खरेदी केल्या जात आहेत ही अत्यंत गंभीर असून अन्यायकारक आहे म्हणून आज प्रकल्पग्रस्त समितीने गर्भित इशारा म्हणून सांकेतिक सत्याग्रह आयोजित केला होता संबंधित विभागाने याची दखल घेऊन प्रकल्पग्रस्तांना आजच्या भावाप्रमाणे मोबदला द्यावा अन्यथा भविष्यात मोठे आंदोलन केले जाईल असा इशारा या निमित्ताने देण्यात आला.यावेळी समितीचे गोवर्धन नांदुरकर विनोद चुन्नु पठाण उपसरपंच पनोरा अरुण गावंडे श्रीकृष्ण गावंडे राजेंद्र गावंडे प्रमोद धागे श्याम जिचकार हरिभाऊ धंदर सोपान पोफळे सुमनबाई नाईक संगीता सरदार गजानन गवळी प्रमोद मानकर पंजाबराव गावंडे नथुजी डोंगरे जनार्दन डोंगरे राजू गावंडे जगन्नाथ नांदुरकर गोपाळराव डोंगरे रघुनाथ वानखडे आदी प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.आम्हाला न्याय मिळाला नाही तर भविष्यात आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला.
विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती च्या वतीने पूर्णा बॅरेज पारद येथे सांकेतिक सत्याग्रह संपन्न..
अकोला जिल्हा प्रतिनिधी:-डॉ संजय चव्हाण