अचलपूर पंचायत समिती, अंतर्गत वाघडोह, गावाला अमरावती जिल्ह्याचे समाज कल्याण सभापती, दयाराम काळे यांनी भेट देऊन उपस्थित शिक्षकांची चांगलीच खरडपट्टी केली, या शाळेत एकुण विद्यार्थी संख्या 93 आहे त्यापैकी एकूण 70 विद्यार्थी शाळेत उपस्थित होते.शाळेमध्ये मुलींची संख्या 42 आहे, याठिकाणी मुख्याध्यापक सह, अधिक चार शिक्षक कार्यरत आहेत, परंतु समाज कल्याण सभापती, यांच्यासमक्ष, शाळेवर दोनच शिक्षक असल्याने, सभापती चांगले संतापले.पाच पैकी, दोन महिला मॅडम, लग्नाला गेले असून दुसऱ्या शिक्षिका, ह्या आता बीड, परीक्षेला अर्जित रजेवर गेले असल्याचे समजते, त्यामुळे शिक्षणाचा बट्ट्याबोळ, झाल्याचे सभापतीच्या निदर्शनास आले मुलांना विचारलेल्या गणिताचे धडे विद्यार्थ्यांना आल्या नसल्याने.शिक्षकांनी सांगितले की, मुले आता करुणा मुळे शब्द अक्षर विसरले असतील त्यामुळे शाळेच्या उपस्थित नागरिकांमध्ये एकच हशा पिकला होता
RC24news चॅनल चे प्रतिनिधी
यांनी पुढील वृत्तात जिल्हा परिषद शाळेत मध्ये विद्यार्थ्यांशी संवाद करण्याचा निर्णय घेतला आहे.मेळघाट मध्ये धारणी, चिखलदरा, अचलपूर तालुक्यात किती विद्यार्थी, साक्षर झाले याची मोहीम हाती घेतली आहे, पुढील अंकात शिक्षणाचा भ्रष्टाचार, शिक्षकांचे आपडाउन,पगार पर्यंतच शिक्षकाचा लेखा जोखा, भांडाफोड, लवकरच करण्यात येईल, त्या साठी, पुढे हि वृत्तांकन होईल, वाघोली जि प शाळेत सभापतीच्या क्लास बद्दल वागडोह परिसरात नागरिकांमध्ये चर्चा पसरली असल्याचे दिसून आले, नागरिकांना शिक्षण, विभागाचे गलथान कारभार वर ताशेरे ओढले असल्याचे दिसून येते. गरीब आदिवासी विद्यार्थ्यांच्या, चांगले, दर्जाचे शिक्षण मिळत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे
🔷प्रतिक्रिया-
दि. 23/12/2021 ला अचलपूर तालुक्यातील वागडोह येथिल जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा ला भेट दिली असता येथील काही शिक्षक अनुपस्थित दिसले. तसेच येथे एक ते आठ पर्यंत वर्ग असुन आठव्या वर्गातील मुलाला 59 लिहता येत नाही. ही मोठी गभिंर बाब आहे. याप्रकरणी येथिल शिक्षकांवर योग्यरीत्या कारवाई होईल. असे म्हणने अमरावती जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती दयाराम काळे यांचे आहे