यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील वनोजा हे गाव काहितरी नविन करण्यास प्रसिद्ध आहे. मागील वर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत वनोजा येथील निवडणूक अनपोज करण्यात यशस्वी झाली आणि आता शासनाने रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्यात दरवर्षी सिंचन विहीर व गुरांचा गोठा वाटप करण्यात येते मात्र ग्रामपंचायत वर ज्या गटाचे वर्चस्व असते ते आपल्या मर्जीतील लोकांना सिंचन विहीर व गुरांचा गोठा यांच्या वाटप करत असते आणि याचे प्रतय अनेक गावांतील गोर गरीब शेतकरी यांना आले आहे मात्र वनोजा ग्रामपंचायत हि काहितरी नविन करण्यास सुरुवात केली आहे आणि वनोजा येथे सिंचन विहीरीचा व गुरांचा गोठयाच्या वाटप ईश्वर चिठ्ठी ने केला आहे या ईश्वर चिठ्ठी ने लागलेल्या विहीर येशा जागो आत्राम,इंदु बाई देवराव खोड, तुषार नारायण वाघमारे, श्रीकांत नानाजी वटाणे, नामदेव बापुराव काचोळे, या पाच लोकांना सिंचन विहीरी तर इंदु किसना चिचोने, अनिल चपंत तायवाडे, उत्तम भगवान गुडघे, राजेंद्र तानबा धोंगडे, दत्तु किसना काळे यांना गुरांचे गोठे ईश्वर चिठ्ठी ने लागले आहे.सिंचन विहीरी साठी 35 अज आले तर गुरांचा गोठयासाठी 18 अज प्राप्त झाले होते मात्र वनोजा ग्रामपंचायतने हे चांगले काम केल्याची चर्चा वनोजा येथे आहे मात्र असेच काम जर सर्व ग्रामपंचायतने केले तर सर्व गोर गरीब शेतकऱ्यांच्या फायदा होईल मात्र असे सर्व ग्रामपंचायत करेल का हा प्रश्न णच आहे कारण असे केले तर त्यांच्या जवळचे लोक सुटतील हे मात्र विशेष यावेळी सरपंच्या सौ. चंदाताई पोटुरकर, उपसरपंच प्रभाकरराव दांडेकर, तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, सचिव आरती वडुले,पि.एस.धुमळ कृषी सहायक, तलाठी व्हि.एन. भोयर, तसेच सर्व वनोजा गावकरी हजर होते
वनोज ग्रामपंचायतने सिंचन विहीर,व गुरांचा गोठा यांची ईश्वर चिठ्ठिने सोडतं...
संजय कारवटकर यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी.