जळगाव जामोद तालुका शेतकरी खरेदी विक्री सहकारी समिती मर्यादित जळगाव जामोद येथे दिनांक ३० डिसेंबर रोजी स्थानिक शेतकी खरेदी विक्री संस्थेच्या गोडाऊन मध्ये शासकीय भरड धान्य खरेदी योजनेंतर्गत ज्वारी व मका खरेदी चा शुभारंभ जळगांव जामोद मतदार संघाचे आमदार माजी मंत्री डॉ. संजय कुटे यांचे हस्ते करण्यात आला.यावेळी पुरवठा निरीक्षण अधिकारी बि.एस.किटे ,पुरवठा निरीक्षक योगेश सातव, खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष विजय ठाकरे ,उपाध्यक्ष सुभाष ससाणे संचालक अविनाश उमरकर, कैलास देशमुख, विलास अवचार, अतुल गावडे, संजय भुजबळ,गोदाम पालक व्ही. डी. खुपासे ,खरेदी विक्री संस्थेचे व्यवस्थापक प्रल्हाद वायझोडे, केंद्र प्रमुख अमोल धुमाळे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव प्रमोद पुदाके, महादेव बाठे, शेतकरी सै. अफरोज अनंत वाघ, प्रकाश राउत व दोन्ही संस्थाचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
शासकीय भरड धान्य खरेदी योजनेअंतर्गत ज्वारी मका खरेदीचा आ. संजय कुटे यांच्या हस्ते शुभारंभ...
जळगाव जा.प्रतिनिधी:-