चिखलदरा तालुक्यातील टेबुरसोंडा येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात अमरावती जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती दयाराम काळे यांच्या अथक प्रयत्नाने या प्राथमिक आरोग्य केंद्राला अजुन एक नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली आहे.काही महिन्यांपूर्वीच दयाराम काळे यांनी एक रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली होती परंतु या केद्राचा परीसर मोठा असल्याने एक रुग्णवाहिका रुग्णानकरीता कमि पडत असल्याने या प्राथमिक आरोग्य केंद्राला ला जिल्हा परिषद सभापती दयाराम काळे यांच्या अथक प्रयत्नाने आज रोजी दुसरी रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली आहे. रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिल्या बद्दल परिसरातील नागरिकांनी व प्राथमिक आरोग्य केंद्रातील टिम ने आभार मानले आहेत. या रुग्णवाहिका चा उद्घाटन जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती दयाराम काळे यांचे हस्ते दि. १६/१२/२०२१ ला करण्यात आला आहे.या उद्घाटनप्रसंगी चिखलदरा पंचायत समिती सभापती बंन्सी भाऊ जामकर, रुग्ण कल्याण समिती सदस्य राजु भास्करे, देशोन्नती चिखलदरा प्रतिनिधी विनायक भाऊ येवले डॉ. चंदन पिपंरकर, लालजी दहीकर, खांजी तोटे, श्रीराम मावस्कर, तसेच गावातील नागरिक व आरोग्य अधिकारी कर्मचारी हे होते.
टेबुरसोंडा येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात अजून एक रुग्णवाहिका...
राजु भास्करे /चिखलदरा तालुका प्रतिनिधी