जळगांव जामोद प्रतिनिधी: -
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ बैठक दिनांक १५ डिसेंबर रोजी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष नितेश मानकर यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख उपस्थिती मध्ये महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख , महाराष्ट्र कार्यालय संपर्क प्रमुख मंगेश राजनकार , बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्ष गोविंद आम्बुसकर , बुलढाणा जिल्हा सचिव मोहन हिवाळे यांच्या उपस्थिती मध्ये जळगांव जामोद येथे संपन्न झाली.वरील बैठकीत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलासबापू देशमुख यांनी संघटनेचे महत्व सांगितले तर नितेश मानकर यांनी भरारी स्मृणीका व अधिवेशन माहिती दिली यावेळी जिल्हा अध्यक्ष नितेश मानकर यांनी जिल्हा कार्यकारिणी घोषित केली या कार्यक्रमात जिल्हा प्रसिद्ध प्रमुख मनिष ताडे , जिल्हा उपाध्यक्ष आश्विन राजपूत ,यांची नियुक्ती करण्यात आली तर तालुका अध्यक्ष गणेश भड यांनी तालुका सचिव पदी RC24 न्युजचे जिल्हा विशेष प्रतिनिधी अनिल भगत यांची नियुक्ती केली. तालुका संपर्क प्रमुख अमोल भगत , उपाध्यक्षपदी मंगल काकडे ,अनिल दांडगे, गणेश गायकी, तालुका संघटकपदी अहिल्या24 न्युजचे संपादक शिवदास सोनोने,अमर तायडे ,विनोद चिपडे,सहसंघटक पदी विजय वानखडे, प्रसिद्धी प्रमुख पदी गजानन सोनटक्के,संतोष कुलथे यांची नियुक्ती केली.यावेळी जेष्ठ पत्रकार राजकुमार भड , देविदास तायडे , जयदेव वानखडे , शमीम देशमुख , आर.सी न्युज संपादक राजेश बाठे , एम.सी.एन . न्युज सहसंपादक राजु वाढे ,गणेश गिर्हे, संजय दांडगे , राहुल निर्मळ,संतोष कुलथे यांच्यासह संग्रामपूर तालुका अध्यक्ष प्रभुदास पारस्कार , इत्यादी पत्रकार उपस्थित होते.कार्यकामाचे आभार प्रदर्शन अनिल भगत यांनी केले.