मेळघाटात आदिवासी विकास महामंडळाच्या खरेदी केंद्रावर भरड धान्य विक्रीसाठी आणाल, तर ते धान्य वाहनातून खाली करा, चाळणी करा, वजन काटा करा, गोदामात थप्पी लावा व नोंद झाली की मग घरी जाण्याची सुटी इथपर्यंत कारभार करावा लागत असल्याचे संतापजनक चित्र आहे. जुन्या दरपत्रकानुसार हमाल मिळत नसल्याने मेळघाटातील शेतकरी हमाल झाल्याचे वास्तव आहे.मेळघाटाच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात आदिवासी विकास महामंडळामार्फत चुरणी, गौलखेडा बाजार, धारणी, हरीसाल, बैरागड, कळमखार, सावलीखेडा अशा जवळपास आठ केंद्रावर आदिवासी विकास महामंडळातर्फे मंका व इतर भरड धान्य खरेदी करण्याचे आदेश राज्य शासनाने तब्बल एक महिना उशिरा दिले. राज्यात एक नोव्हेंबर पासून ही खरेदी दर वर्षी केली जाते. यदा मात्र डिसेंबर महिन्याचा मृहुत निघाला.यासाठी वारंवार आदिवासी विकास महामंडळाचे सचांलक तथा माजी आमदार केवलराम काळे प्रादेशिक व्यवस्थापक नरेंद्र रणमले आदींनी सतत पाठपुरावा पोटलवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा मका खरेदी विविध केद्रावर सुरू आहे. मेळघाटातील इतर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी तक्रारही केली. परंतु महामंडळसुध्दा हतबल झाले आहे.
--------------------
अपंग शेतकऱ्यांची कसरत
चुरनी खरेदी केंद्रावर महिला ग्रेडर आहेत. शाक्षकिय दराप्रमाणे हमाल येत नसल्याने बामादही येथिल नेहरू झारखंडे नामक अंपग शेतकऱ्यालाच मका केद्रावर मोजावा लागला. त्यांना इतर शेतकऱ्याने सहकार्य केले.
------—------------
हमालीचे दरपञक जुनेच
शासनाच्या या खरदी केद्रावर प्रतिक्विंटल 12रुपये 99 पैसे दर आहेत. खाजगी बाजारात व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 20 रुपये पेक्षा अधिक दर असल्याने हमाल येथे काम करण्यास तयार नाहीत.
-------------------
आदिवासी महामंडळाच्या खरेदी केंद्रावर आदिवासी शेतकरीच हमाल झाले. हमाली दर कमी असल्याने शासनाने तत्काळ दखल घेऊन व्यवस्था करावी.
स्वप्नील भक्ते
समाजिक कार्यकर्त्यां, चुरणी
---------------------
शाक्षकिय दर 12 रुपये 99 पैसे असल्याने हमाल त्या दरात करायला तयार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना केद्रावर शेतकऱ्यांना वजन काटा करावा लागत आहे. या संदर्भात वरिष्ठ अधिकारी व शासनाला कळविले आहे.
वर्षा निघोट ग्रेडर
आदिवासी महामंडळ केद्र चुरणी