हिवरखेड पोलीस स्टेंशन अंतर्गत येत असलेल्या अडगाव व सदरपुर परिसरात महसूल मंडळांनी चार जानेवारी रोजी तेल्हारा तहसीलदार राजेश गुरव यांनी धाडसी कारवाई करीत सरकारी गटातून अवैध गौण खनिज उत्खनन करून वाहतूक करताना आढळल्यामुळे हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सदरपुर परिसरात एक पोकलेन मशीन तसेच दोन ट्रॅक्टर आणि दोन ट्रॉली जप्त केल्या असून जप्त केलेली पोकलेन मशीन पोलीस पाटील यांच्या ताब्यात देण्यात आली तर दोन ट्रॅक्टर आणि दोन ट्रॉली हिवरखेड पोलीस स्टेशन मध्ये सुपूर्द नामावर जमा करण्यात आले.चालक गणेश समाधान घुले राहणार अडगाव बु. यांचे कडून ट्रॅक्टर क्रमांक एम एच 30 बीबी 3159 तसेच विना क्रमांकाची ट्रॉली जप्त करण्यात आली. तसेच चालक रवी गजानन काळे राहणार खैरखेड यांच्याकडून ट्रॅक्टर क्रमांक एम एच 30 जे 8939 व ट्रॉली क्रमांक एम एच 30 जे 2788 जप्त करण्यात आले. हे दोघेही विनापरवाना प्रत्येकी एक ब्रास माती, मुरूम वाहतूक करताना मिळून आल्याने सदर जप्तीची कार्यवाही करण्यात आली.उपरोक्त कार्यवाही तहसीलदार राजेश गुरव, तलाठी किशोर गायकी, मंडळ अधिकारी एन डी पवार, शिपाई हिंगणकर इत्यादींनी केली.
🔷विना क्रमांकाच्या पोकलेन ने सुरू होते उत्खनन
गौण खनिज माफियांचे हिम्मत एवढी वाढली आहे की त्यांनी चक्क विना क्रमांकाच्या पोकलेन मशीन द्वारे सरकारी ई क्लास जमिनीवर उत्खनन सुरू करीत होते तहसीलदार गुरव यांनी पोकलेन चालक विकास धुर्वे राहणार बारगाव जिल्हा बैतूल मध्य प्रदेश यांच्याकडून मशीन जप्त करून अधिक माहिती घेतली असता सदर पोकलेन मशीन भास्कर जनार्दन गायगोळे राहणार दर्यापूर यांच्या मालकीची असल्याचे चालकाने सांगितले