रखडलेला स्कायवाक पर्यटन नगरीत लवकरच साकारणार...


 

राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 


केंद्रीय पर्यावरण मंत्री श्री भुपेंद्र यादव यांनी दिले निर्देश

चिखलदरा येथील बऱ्याच दिवसापासून रखडलेल्या स्कायवॉक च्या उर्वरित कामाला मंजुरी मिळाली आहे.आता लवकरच चिखलदरा येथील स्कायवॉक पूर्णत्वास येणार आहे. त्यामुळे पर्यटन वाढून स्थानिकांच्या रोजगार निर्मितीस चालना मिळणार केंद्रीय पर्यावरण,वन एवं जलवायू परिवर्तन मंत्रालय नवी दिल्ली च्या नागपूर येथील एकात्मिक कार्यालयाचे पत्र क्रमांक F.No.Fc-I/MH-227/2021-NGP/9173 नुसार केंद्रीय वने व पर्यावरण विभागाने खासदार सौ नवनीत रवी राणा यांच्या मागणीचा विचार करून व खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी या कार्यालयात स्कायवॉक संदर्भात घेतलेल्या भेटीच्या अनुषंगाने AIGF(central)श्री सी बी तहसीलदार साहेब व नोडल ऑफिसर श्री व्ही एन अंबाडे(DDGF IRO,Nagpur)  यांच्या तर्फे प्रेषित पत्रानुसार आता चिखलदरा येथील स्कायवॉक संदर्भातील सर्व परवानगी व परवाने मिळण्यासंदर्भातील अडथळे दूर झाले असून काही अटी व शर्तींच्या आधारे आता या विकासकामाला मान्यता देण्यात येत आहे त्यामुळे चिखलदरा येथील रखडलेल्या स्कायवॉक च्या उर्वरित निर्माणकार्याला लवकरच प्रारंभ होऊन हा स्कायवॉक आता पूर्णत्वास जाईल. खासदार सौ नवनीत रवि राणा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने व पर्यटन आणि रोजगार निर्मिती च्या विकासात्मक दूरदृष्टीने पूर्णत्वास येणाऱ्या या स्काय वॉक मुळे विदर्भाचे नंदनवन असणाऱ्या चिखलदरा येथील पर्यटनाला चालना मिळेल व पर्यटकांची संख्या वाढून स्थानिकांच्या रोजगार निर्मितीत वाढ होईल आणि आशिया खंडातील तिसऱ्या क्रमाकांच्या या स्कायवॉक मुळे चिखलदऱ्याच्या पर्यटन विकासात भर पडेल. खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी केलेल्या पाठपुराव्यानेच हा प्रश्न मार्गी लागला या बद्दल स्थानिक नागरिकांनी खासदार सौ नवनीत रवी राणा यांचे आभार मानले आहे.आशिया खंडातील सर्वात मोठा स्कायवाक पर्यटन नगरीत साकारणार असल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Previous Post Next Post