चिखली येथील खंडेलवाल यांचे कृषी एजन्सी केंद्र फोडणारे अट्टल चोरटे स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात. आरोपी जवळून पाच लाख 75 हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त...


बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी:-अनिल भगत.

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या खंडेलवाल कृषी एजन्सिज चे दुकान दिनांक 1 जून 2021 रोजी अज्ञात चोरट्यांनी फोडले होते व तेथे त्यांनी 36 सोयाबीन बियाण्यांच्या तीस किलो पर बॅग असा एकूण एक हजार 80 किलो सोयाबीन चे बियाणे चोरून नेले होते. चिखली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात कलम 457,454, 380 भारतीय दंड संहितेनुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते. सदरचा गुन्हा उघडकीस आणणे कामी पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा बळीराम गीते याला आदेशित केले होते त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा येथे कारवाई पथक नेमण्यात आले होते. सदरच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन चिखली मधील सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक माहिती गोळा केली होती. सदर सीसीटीव्ही फुटेज मध्ये महिंद्रा झायलो पांढऱ्या रंगाची कार संशयास्पदरीत्या दिसली. त्या अनुषंगाने तपास पथकाने जिल्ह्यातील अभिलेखावरील दुकार गोदावर फोडणाऱ्या टोळ्या तपासले होते परंतु सदरच्या आरोपी हे बाहेरील जिल्ह्यातील असल्याचे असल्याने तपासाला दिशा मिळत नव्हती. बी राग 23 जानेवारी रोजी बळीराम गीते पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांना गोपनीय बातमीदाराने माहिती दिली की सदरचे आरोपी हे महिंद्रा झायलो पांढऱ्या रंगाची कार वापरणारे दोन आरोपी आहेत.ते कारंजा लाड येथील असून सध्या ते चोरीचा माल विकण्याचा तयारीत आहेत अशा माहितीवरून पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बळीराम गीते यांनी अभी गुरु शाखेतील पथकास आदेशित करून कारंजा लाड येथे पाठविले सदर तपास पथक मिळालेल्या गोपनीय माहिती वरुन कारंजा लाड जिल्हा वाशिम येथे जावुन आरोपी हसन उर्फ इम्मीछटु निसुंरवाले व फिरोजखान जस्सीमखान दोन्ही आरोपी राहणार कारंजा लाड येथील असून दोघांनाही स्थानिक गुन्हे शाखेच्या बुलढाणा पथकाने कारंजा लाड इथून दोघांनाही ताब्यात घेतले व विचारपूस केली असता गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी जवळून चोरी कामी वापरण्यात आलेली पांढरी महिंद्रा झायलो कार व चोरून नेण्यात आलेले सोयाबीनचे बियाणे असा एकूण पाच लाख पंच्याहत्तर हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर आरोपी वर वाशिम व हिंगोली जिल्ह्यात घरफोडी व दुकान फोडी चे गुन्हे दाखल आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, बजरंग बनसोडे अप्पर पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बळीराम गीते, यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक निलेश शेळके, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, पोलीस अंमलदार सुधाकर काळे, विजय सोनोने,अजीस परसुवाले,राजु आडवे,मधुकर रगडे यांनी केली.

Previous Post Next Post