संभाजीनगरात महाराणा प्रताप यांचा अश्वारूढ पुतळा होणारच. विरोध केल्यास विश्व हिंदू परिषद बजरंग दल रस्त्यावर उतरेल..


जळगांव जा.प्रतिनिधी:-

संभाजीनगरा मध्ये हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांचा अश्वारुढ पुतळा होणार आहे या पुतळ्याला कोणी विरोध केला च तर विश्व हिंदू परिषद बजरंग दल रस्त्यावर उतरेल असे निवेदन दिनांक 24 जानेवारी रोजी जळगाव जामोद येथे विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे. संभाजीनगर येथे वीर शिरोमणी महाराणा प्रताप छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व हिंदू धर्मीयांची प्रेरणास्थान आहेत आदर्श आहेत. त्यांचा अश्वारूढ पुतळा संभाजीनगर येथे होणारच कोणी विरोध केला तर बजरंग दल रस्त्यावर उतरून निदर्शने करणार महाराणा प्रताप यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याऐवजी सैनिकी शाळा सुरू करा अशी भूमिका ए आय एम आय एम चे खासदार इम्तियाज जलील यांनी केली होती महापालिकेने 87 लाखाचे बजेट तयार करून पुतळ्यास मान्यता दिली आहे. नियमानुसार तिथे महाराणा प्रताप यांचा अश्वारूढ पुतळाच बसणार आहे. त्याच्या केवळ निविदा काढणे बाकी आहे. परंतु ए आय यम आय एम चे खासदार इम्तियाज जलील हे महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याला विरोध करत आहेत. पुतळ्याला कोणीही विरोध केल्यास विश्व हिंदू परिषद बजरंग दल रस्त्यावर उतरेल व आंदोलनाचा पवित्रा घेईल अशा आशयाचे निवेदन दिले आहे. सदर निवेदनावर प्रखंड संयोजक ज्ञानेश्वर कराळे, नगर मंत्री सचिन कपले, किरण ठाकूर, बजरंग दल नगर संयोजक सागर ढगे, बजरंग दल सहसंयोजक रितेश डोबे, नगर सहमंत्री गोपाल जाधव, गोरक्षा प्रमुख सुरेश कोथळकार, अजय वडाळे, सुनील कावरे,रोशन घुले,सुभाष खिरोडकार,परमानंद राजपुत,गणेश म्हसके यांच्यासह बहुसंख्य पदाधिकाऱ्यांचा सह्या आहेत.

Previous Post Next Post